Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती बसस्थानक परिसरात पोलीस मदत केंद्राची आवश्यकता


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : चंद्रपूर - नागपूर महामार्गावर महत्वाचे शहर असलेल्या भद्रावती बसस्थानक परिसरात सायंकाळी पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात यावे अशी परीसरातील नागरिक विशेषतः महिलांची मागणी आहे. 

भद्रावती शहर हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये समाविष्ट असलेले महत्वपूर्ण शहर आहे. या परीसरात देशातील मोठा शस्त्रनिर्मिती आयुध निर्माणी कारखाना आहे. या शहराच्या परिसरात विवीध ठिकाणी कोळसा खदानी आहेत. या शहरात विविध धर्माचे श्रध्दास्थान असलेली मंदिरे आहेत. भद्रनाग स्वामी मंदिर,गौराळा वरद विनायक मंदिर, जैन मंदिर, भवानी मंदिर अशा विविध मंदिरांचा समावेश असल्याने सर्वधर्मीयांसाठी हे शहर पर्यटन स्थळ म्हणून मान्यताप्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन नगरी म्हणून या शहराला घोषित केले आहे. त्यामुळे येथील बसस्थानकावर विविध ठिकाणाहून यात्री व प्रवासी जात येत असतात.विवीध खेडी व गांवे या शहराशी जोडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या शहरातील बसस्थानक परिसरात महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा लागतो. अनेक जेष्ठ नागरिक, महिला,युवक,युवतींना व शाळकरी मुलांना संध्याकाळी बसस्थानक परिसरात आपल्या गावात जाण्यासाठी बसची वाट बघत उभे रहावे लागते. बसस्थानक आसपास हायवेवर अनेक वाईन बार आहे. तेथील मद्यधुंद अवस्थेत असताना अनेक मद्यपींचाही वावर या परिसरात असतो. त्यांच्या मद्यधुंदतेचा अनेक प्रवाशांना त्रास होतो. दारूच्या नशेत हे मद्यपी वाचाळ होतात.व उपस्थितांना त्रास देतात. त्यामुळे परीसरात उपस्थित प्रवाशांना मानसिक त्रास होतो. महिलांसाठी डोकेदुखी वाढली आहे. परंतु हा त्रास बोलताही येत नाही व सहनही होत नाही अशी प्रवाशांची अवस्था आहे. प्रत्येकाला सायंकाळची वेळ असल्याने घर जवळ करायचे असते. त्यामुळे प्रवाशी मुकाट असतात.आणि हे मद्यपी मोकाट असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भद्रावती बसस्थानक परिसरात सायंकाळी सुर्यास्त झाल्यापासून शेवटची बस जाईपर्यंत पोलिस मदत केंद्र सुरु करण्यात यावे अशी परीसरातील नागरिक मागणी करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या