दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्याची इम्रान खान यांची मागणी.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ग्राहकाचे बायोमेट्रिक घेतल्यानंतर तीन महिन्यांचे राशन न देता राशन दुकानदाराने फसवणूक केल्याच्या आरोपामूळे राशन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
याप्रकरणी भाजप युवामोर्च्याचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी तहसीलदारा मार्फत पोलीस निरीक्षकांना निवेदन देत संबंधित राशन दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भद्रावती शहरातील चंडिका वार्ड डोलारा येथील लाभार्थी सानिया महाकुळकर यांच्या बाबत हा प्रकार घडल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर २०२५, २३ डिसेंबर २०२५ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी लाभार्थांचे बायोमेट्रिक घेण्यात आले. मात्र त्यानंतरही राशन दुकानदाराने धान्य दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसुन जाणीवपूर्वक फसवणूक केली. जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी म्हटले आहे. तसेच शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेचा गैरवापर करून गरजू लाभार्थांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून राशन व्यवस्थेतील पारदर्शकते बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तहसीलदार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकानदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. लाभार्थ्यास तीन महिन्याचे थकित धान्य त्वरित मिळावे तसेच संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे.



0 टिप्पण्या