सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- डोणगाव ग्रामपंचायत डोणगाव येथे 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे व सर्व कागदपत्रे देणार असल्याचे त्या वेळी ग्रामसेविका गोसावी मॅडम यांनी सांगितले होते.
त्याच अनुसंगाने आज दि. 02/02/2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार होती पण ग्रामसभेचा अजेंडा व वरिष्ठाचे कोणतेच पत्र आले नसल्याने व सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ही ग्रामसभा शुक्रवार दि. 06/02/2026 रोजी सकाळी 9:30 वा. आयोजित करण्यात येणार असल्याचे ग्रामसेविका गोसावी मॅडम यांनी सांगितले.
ग्रामसभेत आता ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न सुटणार का? ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर त्यांना मिळणार का? अशा अनेक प्रश्नांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत.
या ग्रामसभेला जामखेड चे तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब, गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता साहेब, संबंधित ठेकेदार, तत्कालीन ग्रामसेवक साहेब हे सर्व व अनेक अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. या ग्रामसभेकडे डोणगाव ग्रामस्थांसह जामखेड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या