नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील मालमत्ता धारकांची कुचंबणा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-ग्रामपंचायतीचे विलीनीकरण होऊन १९९७ मध्ये नगरपरिषद भद्रावतीची निर्मिती झाली. विंजासन, सुमठाना, गवराळा, फुकटनगर आदी परिसरातील मालमत्ता धारकांना अजूनही मोजमाप न झाल्याने आखीव पत्रिका उपलब्ध होऊ शकली नाही. अनेकदा अनेकांनी प्रशासनाला निवेदन दिले. तरीही मालमत्ता कर गोळा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेने मालमत्ता धारकांची हक्काची अधिकृत आखीव पत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत ठोस कार्यवाही अजूनही केली नाही. दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी गणपती वार्ड गवराळा येथील तेजकरण बदखल, गणेश बदखल, शामराव चेंदे, यांच्या नेतृत्वात भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना निवेदन सादर करण्यात येऊन अधिकृत आखीव पत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी तसा प्रस्ताव करून लवकरच मोजणी प्रक्रिया सुरु करून हि समस्या निकाली काढण्याची कार्यवाही करू असे संबंधितांना सांगितले निवेदन देते वेळी मधुकर सावनकर, देवराव खापणे, शंकर चिवंडे, धनराज शेरकी, पांडुरंग चिंचोलकर, अनिल झाडे, महादेव बुच्चे, सुभाष निंबाळकर, रमेश खापणे, व प्रणय घोरुडेआदी उपस्थित होते.



0 टिप्पण्या