चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :-अकलूज येथे पांचाळ सोनार समाज व पांचाळ सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७४० वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.अकलूज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी श्री.नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सकाळी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा सुभाष पोतदार व भाग्यश्री पोतदार उभयंयांचा हस्ते करण्यात आली. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत संग्रामनगरच्या गुरुकुलातील भजनी मंडळाची भजने होऊन दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे,लालासाहेब अडगळे यांच्यासह समाज बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.त्यानंतर समाज बांधव भगिनींना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजीव लोहकरे, उपाध्यक्ष सुभाष पोतदार,सचिव प्रकाश कामेगांवकर,खजिनदार हर्षद लोहकरे,सदस्य संजय पोतदार,अरुण क्षिरसागर,अनिल पोतदार,निरंजन पंडित,अमित लोहकरे,नंदकुमार पोतदार,पत्रकार केदार लोहकरे,माजी अध्यक्ष बाळासाहेब वेदपाठक व सहका-यांनी परिश्रम घेतले.



0 टिप्पण्या