Ticker

6/recent/ticker-posts

ताहेरा फाउंडेशने अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे - सयाजीराजे मोहिते-पाटील


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज :-रमजान महिन्याच्या पवित्र पहिला उपवास आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज येथे ताहेरा फाउंडेशन यांच्या वतीने जुन्या बस स्थानकाजवळ सनराईज कलेक्शनच्या बाजूला पाणपोई सुरू करण्यात आली.त्याचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
                या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताहेरा फाउंडेशनच्या वतीने इलाही बागवान यांनी फाउंडेशच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली व जुने एसटी स्टँड या परिसरात पाणपोईची गरज होती.या भागात नेहमीच लोकांची वर्दळ असते.बाहेरगावावरून आलेल्या महिला,लहानमुले आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सोय व्हावी म्हणून पाणपोईचा उपक्रम राबवण्याचा ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी व फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.
              अकलूज परिसरात ताहेरा फाउंडेशन एक सामाजीक बांधिलकी जपणारी संघटना असून आजपर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजामध्ये निर्माण केला असल्याचे सयाजीराजे मोहिते- पाटील यांनी सांगितले.यावेळी अकलूजच्या नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी पाणपोईच्या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.नूतन नगरसेवक क्रांतीसिंह माने-पाटील यांनीही पाणपोईची सदर भागात अवश्यकता असल्याने ताहेरा फाउंडेशनचे कौतुक केले.  या प्रसंगी धर्मगुरु अलहाज हाफीज गणी मौलानाही आवर्जून उपस्थित होते. सदर भागातील शॉपिंग सेंटर मधील अनेक गाळेधारक व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 
            हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी असलमभाई तांबोळी,जाकीर तांबोळी,मेंबर दादाभाई तांबोळी,हसन बागवान, शाहिद तांबोळी,शादाब तांबोळी यांनी हाजी अबूबकरभाई  तांबोळी यांच्या सोबत परिश्रम घेतले.अनेक गाळाधारकांच्या वतीने पाणपोईच्या उद्घाटनाबद्दल आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याबद्दल नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या