चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.):- प्लास्टिकच्या कपांवर व प्लास्टिक-कोटेड पेपर कपवर बंदी असूनही, अनेक चहाच्या टपऱ्यांवर व सार्वजनिक समारंभ याठिकाणी चोरट्या मार्गाने त्यांचा वापर सर्रास सुरूच असल्याने आरोग्यासाठी कॅन्सरचा धोका आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहे. प्रशासनाने प्लास्टिक कपावर कपांवर बंदी घातली असूनही कायद्याची अंमलबजावणी कमकुवत असल्याने अनधिकृत वापर सुरू आहे.गरम चहामुळे प्लास्टिक कपांमधून सूक्ष्म प्लास्टिक शरीरात जाते, त्यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात असे वैद्यकीय अहवालात स्पस्ट झाला आहे.प्लास्टिक कपावर बंदी असूनही, सोयीस्करतेमुळे आणि स्वस्त दरामुळे अनेक टपरीचालक अजूनही या कपचा वापर करत आहेत. प्लास्टिक कपांचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर कारवाई करून घोषित दंडाची आकारणी करणे गरजेचे झाले आहे.प्लास्टिक कपाचा जागी पर्यायी व्यवस्था म्हणून कागदी कप, मातीचे कप, किंवा काचेचे कप हे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते.
प्लास्टिक कप बंदीवर जनजागृती गरज
प्लास्टिकच्या कपांवर व प्लास्टिक-कोटेड पेपर कपवर बंदी केली असलीतरी सामाजिक संस्था यांना प्रोत्साहित करून लोकांना प्लास्टिक कपात चहा पिल्याने मनुष्याला होणार आजार याबाबत जनजागृतीच्या माध्यमातून प्रचार करणे आवश्यक झाले आहे.


0 टिप्पण्या