Ticker

6/recent/ticker-posts

उभ्या ट्रकला मोटारसायकल आढळून इसमाचा जागीच मृत्यू

•पटेल राईस मिल पेंढरी येथील घटना

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी(श.प्र.):- पालांदूर ते पोहरा रोडवर एका इसमाने आपल्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम.एच. २० सी. व्ही. ८९७९ ही मोटार सायकल हयगयीने व लापरवाहीने भरधाव वेगाने चालवुन संतुलन बिगडल्याने पटेल राईस मिल पेंढरी समोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अशोक लेलैंड ट्रक क्र.एम.एच.३५ के. ३६४४ या ट्रकला मागेहुन आदळून स्वता: जखमी होवुन मरण पावला असल्याची घटना (ता.२६ फेब्रुवारी) रोज शुक्रवार दुपारी ३.४५वाजताच्या दरम्यान घडली असून मृतकाचे नाव योगेश मधुकर बरैया वय ४४ वर्ष रा. बोंडगावदेवी ता. अर्जुनी मोरगाव ता. गोंदिया असे आहे.
.              योगेश बरैया हा पेंढरी गावाकडुन पेट्रोल टँकवर गव्हाची पिशवी मांडून अतिवेगाने मोटारसायकल व भरधाव वेगाने चालविल्याने  मोटारसायकल चालक ट्रकच्या मागच्या बाजुला एकदम आदळून खाली पडुन जखमी अवस्थेत मृत्यू झालेला दिसला तसेच मोटार सायकल ५० फूट दूर जाऊन पडलेली दिसल्याने राईस मिल मालक जावेद आबिद छवारे रा.पोहरा यांनी राइस मिल ऑपरेटर नामे अरविंद डोमा शेन्डे वय ५५ वर्ष रा. मचारणा याला विचारपुस केली असता त्याने सर्व माहिती दिल्याने राईस मिल मालक जावेद छवारे यांनी पोलीस स्टेशन लाखनी येथे घटनेची माहीती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या