Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेवकांनी जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे- सतीश धोटे

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी व नगरसेविकांचा सत्कार सोहळा ! 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : आरोही सुगम संगीत विद्यालय व स्वर प्रीती कला अकादमी राजुरा यांच्या वतीने  निवडून आलेल्या तीन नगरसेविकां व निवृत्त मंडळ अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
      नगरसेविका वज्रमाला बतकमवार, अनु हरजीत संधू, मयुरी पहानपटे या स्वर प्रितीच्या सदस्या असून संगीताचे शिक्षण घेणाऱ्या शिष्या आहेत.त्यांना श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन, मान्यवरांच्या हस्ते त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सोबतच सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनील रामटेके व रजनी रामटेके यांचाही त्यांच्या संगीत व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीन  शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन  त्यांना गौरविण्यात आले.
      बाल विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांनी आपल्या भाषणातून 1999 पासून सुरू असलेल्या संगीत शाळेची प्रशंसा केली.नवनिर्वाचित तीनही नगरसेविकांनी  जनसामान्याची समस्या विना विलंब सोडवाव्या अशी अपेक्षा त्यांनी या वेळी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मालती राघवेंद्र देशकर यांनी गुरूकडून शिष्यांचा सत्कार होणे हे गौरवास्पद असल्याचे या वेळी सांगितले.राजुरा येथे संगीत कला सांस्कृतिक क्षेत्रात अनेकांना मंच प्राप्त करून दिल्याबद्दल अनेक गृहिणी उत्तम वक्ते, गायन कला 
 सादर करीत आहेत याबद्दल आरोही सुगम संगीतची प्रशंसा करून हा सोहळा जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचे जतन करणारा आहे अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
       मालती देशकर या आजच्या घडीला तब्बल 92 वर्षाच्या असून त्या तीन तास चाललेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या हे विशेष! स्वर प्रीतीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते व आरोही सुगम संगीताच्या केंद्रप्रमुख अलका सदावर्ते यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले असल्याचे मत सुनील रामटेके यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले.  समयोचित भाषणातून वज्रमाला बतकमवार,  अनु हरजीत संधू आणि मयुरी पहाणपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात बालवैज्ञानिक म्हणून आरोही सुगम संगीतची विद्यार्थिनी तालुका, जिल्हा ते राज्यापर्यंत पोहोचली अशी रामचंद्र धोटे विद्यालयाची विद्यार्थीनी कल्पिता गेडाम हिचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.      
       कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या औक्षवानाने व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मौन पाळून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी स्वागतपर सरगम गीत सादर केले. अभिजीत वाटेकर, जयश्री मंगरूळकर, निर्मला बांगडे यांनी गीत गायन करून उपस्थितांची मने जिंकली तर हार्मोनियम वादन आरुषी डवरे हिने केले. 
      पाहुण्यांचा परिचय विना देशकर, संध्या सराफ, ज्योती कोरडे, प्रिया खंडाळे यांनी करून दिला.  कार्यक्रमाचे संचालन शुभांगी वाटेकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार प्रदर्शन रेणू देशकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या सामूहिक गीत गायनाने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या