चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-जि.प.व पं.स.निवडणुकीचे मतदान दि.७ रोजी संपन्न झाले. आणि हे होताना खुप जुनी असलेली प्रथा,परंपरा यंदाही संबंधितांनी कायम ठेवली आणि इं.काॅं.समर्थक व भाजप,रा.काॅं. महायुती समर्थक यांच्यात चांगलीच वादावादी झाली. वेळीच पोलिसांनी व कांही समजदार लोकांनी हस्तक्षेप केली म्हणुन "दे— दणादण" झाले नाही.नंतर पोलीसांचा तगडा व विशेष बंदोबस्त मागविण्यात आला.असे प्रत्यक्षदर्शीमध्ये बोलले जाते.
यंदाची जि.प.निवडणुक भाजप-रा.काॅं.महायुती व इं.काॅं.मध्ये अत्यंत चुरशीची झाली.प्रचारादरम्यान रा.काॅं -भाजप युतीने ही निवडणुक गत १० वर्षात इं.काॅं.च्या जि.प. सदस्याने कोणती विकास कामे केली?कुणाचे "कल्याण" केले?या मुद्यावर जोरदारपणे लढविली.आनी या मुद्यांची चर्चा सगळीकडे जोरदापणे सुरु झाली.तसे मतदारांवर ही या २ मुद्यांचा चांगलाच प्रभाव पडल्याचे व मतदान विरोधात होत असल्याचे लक्षात येताच इं.काॅं चे स्वयंघोषीत मोठे पुढारी व कांही कार्यकर्ते यांनी भाजप-रा.काॅं.युतीच्या समर्थकांशी अरेरावी सुरु केली.म्हणुन २ ही गटाकडून मोठी वादावादी सुरु झाली. बंदोबस्तात असलेल्या पोलीसांना ही परिस्थिती हॅंडल करणे महाकठीण जाणार,याची गॅरंटी येताच मोठी फौज घेऊन बाहेरुन पोलिसांच्या गाड्या मागविण्यात आल्या आणि परिस्थिती निवळली.माञ झालेला वाद आणि संभाव्य धोका तसेच बाहेरुन सारयन वाजवित आलेल्या पोलिस व्हॅन्स बघून कांहींनी आपले दुकाणे बंद केली.



0 टिप्पण्या