Ticker

6/recent/ticker-posts

३९६ व्या शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी : छत्रपती संभाजी युवा प्रतिष्ठान, मानेगाव (स.) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक व विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या माध्यमातून महाराजांच्या विचारांना उजाळा देत सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती आणि अभिवादन
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस उपअधीक्षक हेमंतकुमार खराबे होते, तर उद्घाटक म्हणून सरपंच आशा सिंगनजुडे उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, युवा उद्योजक प्रशांत गायधने, माजी सरपंच नरेंद्र भांडारकर, सामाजिक कार्यकर्ता उमेश गायधनी, युवा उद्योजक संदिप कावळे, शा.व्य.समिती अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, माजी उपसरपंच पंकज चेटूले, बावनकुळे सर, ग्रा.पं. सदस्य अजय नागलवाडे, कॉन्ट्रॅक्टर देवा तितीरमारे, ग्रा.पं. सदस्य अंजली कुलसुंगे, कुंजना नेवारे आणि नलिनी पाखमोडे यांची उपस्थिती होती.

उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, न्यायप्रियता व सर्वसमावेशक राज्यकारभारावर मार्गदर्शन केले. "आजच्या तरुण पिढीने महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात आणि गाव विकासात पुढाकार घ्यावा, तसेच आपल्या हक्कांप्रती जागरूक राहावे," असे आवाहन यावेळी करण्यात आले. सामाजिक न्यायाची भूमिका जपत सर्वांनी एकजूट राहण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्रपती संभाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नेहाल कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका अल्का वंजारी यांनी केले. 'वंदे मातरम'ने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सोनू माकडे, सचिव क्रिष्णा गायधनी, सहसचिव विशाल रोकडे, सहकोषाध्यक्ष गोलू कुलसुंगे, राहुल सेलोकर, ज्ञानेश्वर हटवार, अशोक नान्हे, पुष्पा बांडेबूचे, वृषभ आग्रे, श्याम कंकलवार, आकाश निखाडे, चुडामणी कंकलवार, शुभम पाखमोडे, रोहित कान्हेकर, अंशू काळे, भावेश सावरकर, समर्थ पाखमोडे, पूजा नेवारे, वैष्णवी सेलोकर, रोहिणी नेवारे आणि आरोही गिऱ्हेपुंजे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या