चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- साकोली येथे भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना शाखा साकोली तालुका जिल्हा भंडारा अंतर्गत दोन दिवशीय भव्य विदर्भ स्तरीय कलाकार मेळाव्याचे आयोजन दिनांक ७ मार्च व ८ मार्च 2026 रोजी होमगार्ड परेड ग्राउंड साकोली येथे सकाळी १०ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे.
दिनांक ७ मार्च ला कार्यक्रमाचे उद्घाटन सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांच्या हस्ते होणार आहे.सह उद्घाटक म्हणून शिलकुमार वैद्य सर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश काळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय लोक कलाकार संघटना अध्यक्ष राहतील. ८ मार्चला महिला जागतिक दिवस व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ लोकशाहीर अंबादासजी नागदेवे सोमलवाडा, विनोद भेंडारकर ग्रामसेवक ग्रामपंचायत सातलवाडा, डॉ.ओमेंद्र येळे अंजली डोळ्यांचा दवाखाना साकोली, पुरुषोत्तम रूखमोडे आदर्श सरपंच स्मार्ट ग्राम खैरी/ बलमाझरी, ताराचंद कापगते पत्रकार देशोन्नती साकोली, संजीव भांबोरे संपादक ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल, नारायण उके उच्च श्रेणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक साकोली, अभय बन्सोड जिल्हा पंचायत राज अधिकारी नागपूर, शाहीर उमेश मेश्राम नवेगाव तुमसर राष्ट्रीय कलापथक निळा निशान, सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन साकोली विधानसभेचे आमदार नानाभाऊ पटोले यांचे हस्ते होईल. सहउद्घाटक म्हणून होमराज कापगते, मदन रामटेके माजी समाज कल्याण सभापती जि प भंडारा, उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाज कल्याण सभापती शितल राऊत उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून वैशाली लांजेवार नगरसेवक उपस्थित उपस्थित राहतील.
दीप प्रज्वलन दीपलताताई समरीत जि प सदस्या ,सीमाताई सिडाम नगरसेविका, त्रिवेणी चौधरी नगरसेविका, निर्मला नंदेश्वर नगरसेविका सायली दोनाडे नगरसेविका सर्व साकोली यांच्या यांच्या उपस्थितीत होईल.
कलामंच पूजक सुशील गणवीर पंचायत समिती सदस्य, अनिल गिरेपुंजे पंचायत समिती सदस्य साकोली, अर्चना ईळपाते पंचायत समिती सदस्य ,संदीप बावनकुळे नगरसेवक, कुणाल नंदेश्वर नगरसेवक ,वासेकर मुख्याधिकारी साकोली, निलेश कदम तहसीलदार साकोली, महादेव आचरेकर पोलीस निरीक्षक साकोली ,जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती साकोली, यांचे उपस्थितीत होईल त्याचप्रमाणे इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्रकाश काळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटना, श्रीकांत नागदेवे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष भंडारा , उमेश बोरकर साकोली तालुका अध्यक्ष भारतीय लोक कलाकार संघटना, गणेश मेश्राम तुमसर तालुकाध्यक्ष उपस्थित राहतील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय लोक कलाकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.


0 टिप्पण्या