राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचे प्रतिपादन
हाजी ट्रेडर्सचे संचालक इरशाद मकरानी यांच्याकडून आयोजित रमजान ईद निमित्त स्नेह मिलन कार्यक्रमात सर्व धर्मीयांचा उत्स्फूर्तपणे सहभाग
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-माहूर शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक तथा हाजी ट्रेडर्सचे संचालक इरशाद मकरानी यांच्या वतीने सर्वधर्मीय नागरिकांमध्ये सलोखा राहावा यासाठी आयोजित स्नेह मिलन शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विशेष उपस्थित महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत तथा ब्रँड अँबेसिडर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शासन पुरस्कृत मार्गदर्शक साईनाथ महाराज वसमतकर यांनी जगाला सर्वधर्मसमभावाची गरज असून जातीय सलोख्यानेच विश्वशांती निर्माण होईल असे प्रतिपादन यावेळी केले
यावेळी दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह इरशाद मकरानी यांनी आयोजित केलेल्या शीरखुर्मा स्नेह मिलन कार्यक्रमात मान्यवरांनी सहभाग घेऊन इरशाद मकराणी यांचे सह त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अंजुम लाला सचिन भाऊ नाईक प्रथम माजी नगराध्यक्ष समर भाऊ त्रिपाठी माजी नगराध्यक्ष गटनेते प्रा राजेंद्र केशवे डॉ निरंजन केशवे नगरसेवक गोपू महामुने अनिल वाघमारे हाजी रऊफ सेठ शकील दलाल रफिक सौदागर डॉ करीम बावाणी असलम अकबानी उस्मान खान चांद खान पठाण नंदकुमार संतान विजय आमले नंदकुमार जोशी सर गजानन भारती बालाजी कोंडे संजय बनसोडे अपील बेलखोडे गोपाल खापर्डे रहमत अली एम आय एम चे माहूर तालुका अध्यक्ष सज्जाद भाई ताहेर आली इरफान उस्मान इरफान उस्मान भाऊराव पाटील हडसणीकर माहूरचे उद्योजक जवाहरलाल जयस्वाल युसुफ भाई छायटीया अनिल पाटील हडसणीकर कृष्णा पाटील हडसणीकर शंकर भाऊ जोशी प्रभू मेहता एस एस पाटील सर आकाश कांबळे प्रकाश दादा गायकवाड सिद्धार्थ तामगाडगे सुनील बेहेरे मनीष राठोड हिरामण वाघमारे रणधीर पाटील राजू सौंदलकर नगरसेवक प्रतिनिधी सलीम कुरेशी गालिब सर सलमान खाकरा रहीम शेख फैजान लाला साबीर भाई बबलू टेलर फैजुल्ला खान शहजाद नवाब अज्जू भाई अय्युब बाबा अजिस शेख शाहिद लाला अरशद खान सोहेल एस आर के अर्सलान शेख शोएब शेरा बुरहान मिर्झा दानिश डी जे शब्बीर शेख लाइक सौदागर अम्मू सौदागर मस्तकीम भाई,जम्मू भाई फरहान बावाणी तौफिक बागवान शाहिद सौदागर यांचे सह शेकडो नागरिकांनी इरशाद मकराणी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या


0 टिप्पण्या