Ticker

6/recent/ticker-posts

बनावट,बोगस,"प्रपत्र" तयार करून, MSEB चंद्रपूर येथे नौकरी करना-यांचा महाघोटाळा उघडकीस


एफ आय आर रजिस्टर  सखोल चौकशी झाल्यास अनेक  नौकरदारांना जेल मध्ये जावे लागणार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : वरोरा येथील   सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील व चंद्रपूर तालुक्यातील, सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील बोगस भरती महाघोटाळा उघडकीस आनला आहे.

मुख्य अभियंता सह अनेक अधिकारी,व उपजिल्हाधिकारी पुनर्वसन चंद्रपूर,सह बोगस नौकरदार विरुद्ध फौजदारी खटला  विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी भद्रावती यांच्या न्यायालयात पुराव्यानिशी दाखल केले असुन दिनांक २/४/२०२६ रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

मुख्य अभियंता सह बोगस नौकरदार यांचे धाबे दणाणले असुन, FIR रजिस्टर होऊन सखोल चौकशी झाल्यास अनेक बोगस नौकरदार यांना जेल मध्ये जावे लागणार असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच MSEB चंद्रपूर येथील कार्यरत अनेक बोगस नौकरदार विरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर व दुर्गापूर पोलिस स्टेशन येथे 420 सह अनेक कलमानुसार FIR रजिस्टर झाले होते. मात्र मुख्य आरोपी मुख्य अभियंता सह अनेक अधिकारी बाहेर मोकाट फिरत होते.

सविस्तर असे आहे की
विनोद खोब्रागडे यांचे  सख्ये मामा दादाजी लक्ष्मन कातकर रा. गुळगाव तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर, यांची सामाहीक मालकिची शेतजमीन सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे १९८२ ला भुसंपादीत झाली होती. यांना मुलबाळ नाही, असे असतानाही छोटा नागपूर- चंद्रपूर तालुक्यातील  गौतम तुळशीराम कातकर (MSEB नौकरी) यांनी महसूल
 अधिकारी व सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांचा सोबत संगनमत करून त्या़ंच्या मुलगा अमोल गौतम कातकर यांना दादाजी लक्ष्मन कातकर यांचे नातु दाखविले, स्वतःला मुलगा दाखवला, पत्नीला सुन दाखविले, बोगस राशन कार्ड तयार केले, बोगस शपथपत्र तयार करून,बोगस प्रपत्र उपजिल्हाधिकारी चंद्रपूर पुनर्वसन यांच्या कडून तयार केले, आणि मुख्य अभियंता सह अनेक अधिकारी सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांच्या सोबत संगनमत करून बोगस नौकरी करीत आहे.

नुकतेच २-३ लाख रुपये घेऊन बोगस प्रपत्र तयार करणारे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन चंद्रपूर येथील वरिष्ठ लिपिक यांना ACB ने धाड टाकून अटक केली आहे.

सदर प्रकरण विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी पोलिस प्रशासन भद्रावती व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना गंभीर तक्रार केली मात्र त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही.

अखेर कोर्ट विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी भद्रावती यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला असून दिनांक २/४/२०२६ रोजी सुनावणी आहे.

सदर प्रकरण मुख्य अभियंता सह अनेक अधिकारी सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांचा तसेच उपजिल्हाधिकारी पुनर्वसन चंद्रपूर, विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला असून अनेक बोगस नौकरदारानां जेल मध्ये जावे लागणार व शासनाचे आजपर्यंत उचल केलेली रक्कम सुद्धा द्यावे लागणार आहे.

या प्रकरणात न्यायमूर्ती काय आदेश करतात याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या