चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी(श.प्र.):-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक यांची ग्रामसभेच्या माध्यमातून निवड झाली असून सन-२००६ पासुन कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकाची सेवा तात्पुरता स्वरूपाची असलीतरी त्यांच्या नियमित कर्मचारी प्रमाणे काम करावे लागत आहे. ग्रामरोजगार सहाय्यक यांना शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या ६% निधीमधुन मानधन टक्केवारीने दिला जात होता पण ग्रामरोजगार साहाय्यक यांच्या संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या दबावाखाली निवडणुक डोळ्यासमोर असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने दिनांक ०३ ऑक्टो २०२४ रोजी रोजगार सहाय्यक यांच्या मानधनात सुधारणा विषयी तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी दोन हजार मनुष्य दिवस करण्याऱ्या ग्रामपंचायत मधील कार्यरत ग्रामरोजगार सहाय्यक यांना आठ हजार मानधन व दोन हजार प्रवास भत्ता व नेट पॅक असे फिक्स मानधन देण्याचा शासन निर्णय निगर्मीत केला असलातरी आजपर्यंत १७ महिने लोटूनही ०३ ऑक्टो २०२४ च्या मानधन सुधारणा विषयी शासन निर्णयाची अमलबजावणी झाली नाही.त्यामुळे राज्यातील कंत्राटी कर्मचारी करीता लढणारे कर्तृत्व विधान परिषद आ.डॉ.परिणय फुके यांना भंडारा जिल्हा रोजगार सहाय्यक संघटनाच्या वतीने (ता.१४ मार्च) रोज शनिवारला लाखनी येथील निवासस्थानी जनता दरबारात शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकानी निवेदन देऊन ग्रामरोजगार सहाय्यकानी आपली कैफियत मांडली. निवेदन दिले त्यावेळी जन सामान्य माणसासाठी लढा देणारे जननायक सामाजिक कार्यकर्ता दिलीपजी चित्रीवेकर लाखांदूर, जिल्हाअध्यक्ष सेवक नागफासे भंडारा, जिल्हा सचिव रमेश बसीने, जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम बोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष डिगांबर शामकुवर ,माजी जिल्हाध्यक्ष महिंद्र मेश्राम, जिल्हा सहसचिव हेमंत देवगडे, साकोली रोजगार सेवक संघटना अध्यक्ष रामेश्वर टेंभुरने, उपाध्यक्ष हरीभाऊ येळमे, लाखांदूर तालुका सचिव सुनील लोणारे, उपाध्यक्ष राजकुमार नान्हे लाखांदूर तसेच भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत ग्रामरोजगार सहाय्यक यांनी आ.डॉ.परिणय फुके यांच्या समोर कैफियत मांडतानी ग्रामसभेच्या माध्यमातुन नियोजन तयार करणे, गावामध्येच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे, त्यांचे हजेरी प्रत्रक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काढणे, कामाच्या स्थळी जाऊन मजुरांची हजेरी घेणे आणि पुन्हा तालुक्याच्या ठिकाणी सादर करणे, ई पीक करणे,कृषी विभागाचे काम तसेच ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांना वेळोवेळी मदत करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत येणारी सर्व कामे तसेच संपूर्ण दस्तवेज साभाळणे, आणि रोजगार सेवकांचे काम अर्धवेळ स्वरूपाचे असून पूर्णवेळ काम ग्रामरोजगार सहाय्यक करीत असल्याचे सांगितले.
आ.डॉ.परिणय फुके ग्रामरोजगार सहाय्यक यांना मानधन मिळवून देण्यास कटिबद्ध
ग्रामीण भागातील मजुरांच्या जीवन वाहिनीच्या प्रवाहाला दिशा देणारे ग्राम रोजगार सेवकांना निश्चित वेतन मिळावे आणि त्यांच्या सेवा बाह्यस्थ पद्धतीऐवजी अधिक सुरक्षित स्वरूपात असाव्यात, ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनासाठी आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याने विधिमंडळात आणि शासन स्तरावर या विषयावर आवाज उठवणार असून न्याय भेटेपर्यत रोजगार सेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आ.डॉ.परिणय फुके म्हणाले.


0 टिप्पण्या