चित्रा न्युज प्रतिनिधी
ठाणे :- दिनांक २३/०३/२०२६ रोजी दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन च्या वतिने दिव्यांग,विधवा महिला,ज्येष्ठ नागरिक,वंचित बहुजन मागासवर्गीय या समाजातील सर्व घटकांसाठी ठाणे महानगरपालिका वर आक्रोश आंदोलन,बेमुदत उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.प्रा.भरत जाधव सर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ःदिव्यांग हयुमन राईट फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी समाजसेवक उपस्थित होते.प्रमुख मागण्या दिव्यांग कायदा २०१६ नुसार वार्षिक उत्पन्नातुन ५टक्के राखीव निधी खर्च करणे.दिव्यांगाच्या ४ ते ५टक्के नोकर भरती तत्काळ करणे.दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करणे.दिव्यांगाना घरकुलं योजना कस्टर ,पंतप्रधान योजना इत्यादी ५टक्केघरे,गाळे राखीव ठेवावेत.ठाणे महानगरपालिका हॅास्पिटल मध्ये मोफत सुविधा उपलब्ध करुन द्यावी.विधवा महिला,ज्येष्ठ नागरिकांना लवकर अनुदान मिळावे तसेच दिव्यांगाना ५टक्के सदस्य विविध समित्या व स्विक्रुत नगरसेवक,नगरसेवक समाजसेवक,शिक्षण,क्रिडा इत्यादी क्षेत्रातील दिव्यांगाची नियुक्ती करावी.तसेच पाणी व टॅक्स मोफत करण्यात यावा.विविध मागण्याचा पाठपुरावा करून अतिरिक्त आयुक्त मा.मालवे साहेब यांनी एप्रिल महिन्यात च्या पहिल्या आठवड्यात कार्यवाही करणारे पेपर व माहिती देऊ असे आदेश सर्व विभागाला दिले.या आंदोलनाला प्रा.विलास शेजुळ यांनी आरक्षण बचाव समिती चा पाठिंबा जाहीर देऊन संविधान कायद्याचे तुमच्या सोबत लढा असे सांगितले.या आंदोलनात बहुसंख्य दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक,विधवा महिला,वंचित बहुजन मागासवर्गीय समाजातील समाजसेवक पदाधिकारी सहभागी झाले.संतोष मोरे उपाध्यक्ष,चंद्रकांत पाटील संघटक,विकास पवार संघटक ठाणे,रमेश पाटील दिवा शहर अध्यक्ष,रोहीदास जाधव संघटक ठाणे शहर, संतोषी सिंग महाराष्ट्र महिला संघटक प्रमुख ,मनिषा भोईर,महिला संघटक ,रेणूका गायकवाड महिला कोळसेत प्रमुख नेताजी चौधरी सल्लागार,हैदर भाई,अन्वर खलिते कोकण विभाग अध्यक्ष सिंग भाई मुंलुड संघटक बहुसंख्य सदस्य समाजसेवक पदाधिकारी उपस्थित मोठा विजय ठाणे कर नागरिकांचा , दिव्यांग,विधवा महिला,ज्येष्ठ नागरिकांचा एकजुटीचा विजय आहे.


0 टिप्पण्या