आमदार पाटील यांनी सरकारला धरले धारेवर
शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका - आमदार अभिजीत पाटील.
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-माढा येथील महावितरण कार्यालयावर माढा तालुक्यात होत असलेल्या लोड शेडिंगच्या विरोधात जनसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी आक्रोश जनआंदोलन मोर्चा आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
माढा तालुक्यात सध्या दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत लोड शेडिंग करण्यात येत आहे. या वीज खंडितामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः महिला, लहान मुले, विद्यार्थीचे परीक्षेचा काळ सुरू असून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांची पिकं होरपळून निघत आहेत, हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या निघून जाईल. उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमुळे वीज नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर ही विपरीत परिणाम होत आहे. असे प्रतिपादन आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केले
माढा तालुक्यातील नागरिक, शेतकरी बांधवांनी काय गुन्हा केला आहे? जर मायबाप जनतेला जाणूनबुजून त्रास देण्याचं काम होत असेलतर हा अन्याय का? हा जाब आमदारानी सरकारला विचारला..
दुष्काळ परस्थिती असो किंवा पूरस्थिती पाणीपट्टी, शाळेची फी, विजेचे बील माफ करावे, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी माढा पूरपरस्थितीच्या वेळी माफ करण्याचे सांगितले होते. यावर अधिवेशनात देखील ही मागणी उचलून धरलेली असून त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी सांगितले.
आम्ही शेतकऱ्यांची पोर आहोत, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी केसेस देखील अंगावर घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण आम्हाला लाईट द्या, लोडशेंडीग तात्काळ बंद करा, नाहीतर ही जनता हातात मशाल घेऊन तुमच्या विद्युत मंडळाच्या कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका.
आज विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका मांडतो, तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी या आंदोलनातून सरकारला जाब विचारला.
यावेळी महावितरण अधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या करण्यात आल्या :
१) सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणारे लोड शेडिंग तात्काळ बंद करावे.
२) वीजपुरवठा नियमित व सुरळीत ठेवावा.
३) 50AMPR पर्यंतच्या पुरवठ्यात लोड शेडिंग करू नये.
नागरिकांच्या या गंभीर समस्यांची दखल घेऊन वीजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, असे निवेदन महावितरण कार्यकारी उपविभागीय अधिकारी संजय मगर यांना देण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे नेते संजय बाबा कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख, राजाभाऊ चवरे,आनंद कानडे,औदुंबर महाडिक, दीपक आबा देशमुख, संतोष दळवी, निलेश पाटील, रामचंद्र मस्के, आबासाहेब साठे, प्रशांत दळवी, दयानंद जाधव, नवनाथ नागटिळक,ओंकार गवसने,ऋषिकेश काका तांबिले, दत्ता पाटेकर, भैया खरात, रवी सरवदे,जितू जमदाडे, शेतकरी बांधव उपस्थित होते. *PressNote*


0 टिप्पण्या