Ticker

6/recent/ticker-posts

शाळेच्या मुलभूत सुविधांसाठी सदैव तत्पर - नगरसेवक विवेक बैरागी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : या ऐतिहासिक व प्राचीन जि. प. शाळेतील मुलभूत सुविधांच्या प्रत्येक निधींसाठी सदैव तत्पर आहे. ही शाळा जिल्ह्यातील दुसरी सर्वात प्राचीन व सन १८६० पूर्वी स्थापित ब्रिटिशकालीन शाळा आहे. या शाळेत माझे बालपण गेले आहे असे प्रतिपादन नगरसेवक विवेक बैरागी यांनी केले. शहरातील "हायटेक" भरारी घेतलेली जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. ०१ गणेश वार्ड साकोली येथे ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. निरोप समारंभ सोहळ्याला प्रमुख अतिथी नगरसेवक तथा शाळा भौतिक सुविधा समिती अध्यक्ष विवेक बैरागी, मुख्याध्यापक सेवकराम हटवार, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्य आशिष चेडगे, पुनम मेश्राम, शिक्षकवृंद टि. आय. पटले, चेतन बोरकर, डी. आर. माहूरे, शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा गवळी, सुनिता गहाणे, आरती कापगते उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक हटवार यांनी येथील विद्यार्थी हा निर्भिड व सर्वगुणसंपन्न आहे. शासकीय शाळेत शालेय अभ्यासक्रमासोबतच शारीरिक व बौद्धिक विकासासाठी विविध आयोजन करण्यात येते, याने विद्यार्थी हा तरबेज व मंचावरील संभाषण कौशल्ययुक्त निर्माण होतो असे प्रतिपादन केले. सदस्य आशिष चेडगे म्हणाले की आता येणाऱ्या खाजगी शाळांच्या प्रवेश भरतीसाठी साकोली क्षेत्रातील पालक जनतेने त्यांच्या ५, १० हजार पैशांच्या आमिषाला बळी पडू नये. त्यांना मुलांचे उच्च शिक्षण नाही तर निव्वळ पटसंख्या वाढवून शिक्षणाचा व्यापार धंदा करणे आहे असे वक्तव्य केले. इयत्ता सातवीच्या निरोप समारंभाचे संचालन विद्यार्थीनी कु. मोहिनी मेश्राम यांनी केले आभार कु. गायत्री नाकाडे हिने मानले शालेय पोषण आहाराच्या मदतनीस रेशमा कोवे, कविता बावणे, छन्नूताई मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या