Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीच्या छञपती शिवाजी महाराज चौकात भरते मोकाट गुरांची शाळा...


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:- येथील अनेक नागरिकांकडे पसाभरही शेती नाही. माञ,गाय,वासरं,कालवडी,म्हशी भरपुर आहेत.
आणि ही मंडळी त्यांच्याकडील जनावरं चरण्यासाठी दिवस-राञ मोकळे सोडतात.म्हणुन अनेकांच्या दुकाण व शेतातील साहित्य,अन्न,धान्यांची नासाडी मोकाट सोडलेली जनावरे करत असतात.आणि या बाबत मोकाट गुरांच्या मालकांना अनेकदा कळवून तसेच त्यांनी स्व:ता बघूनही आपापली गुरे घरी नेऊन बांधण्याऐवजी अरेरावी करतात. असे शेतकरी व व्यापारीबांधव बोलताना समजते.
 अन् हा सगळा प्रकार माहीत असून सुध्दा ग्रा.पं.लक्ष देत नाही.असा आरोप शेतकरी व व्यापारीबांधवांतून केला जातोय.
तसेच मोठ्या थाटामाटात पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पाडलेल्यांना पुतळ्याजवळ होणारा गुरांचा 'धिंगाणा' पुतळ्याची विटंबना झाल्यावर दिसणार आहे का?
तेंव्हा प्रशासनाने मोकाट गुरांचा बंदोबस्त नाही केल्यास सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते.आणि याला ग्रा.पं. प्रशासनच जबाबदार असेल. असे ही बोलले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या