चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर:- दिनांक 3 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी हकनकवाडी तालुका उदगीर येथे भव्य दिव्य अशा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमंत्रित केले होते. विद्यावाचस्पती ह. भ. प. जलाल सय्यद महाराज नाशिककर, ह. भ. प. तुकाराम मुंडे महाराज परळीकर ह. भ. प. भास्कर महाराज सांडोळकर, भागवताचार्य ह. भ. प. मैनाताई देगलूर, ह. भ. प .गोविंद महाराज मुंडे परळी, ह. भ. प. गोविंद महाराज गोरे आळंदी देवाची,ह.भ.प. सोपान महाराज सानप शास्त्री, शिवपुराण कथा ह. भ. प. संगमेश्वर पटवारी महाराज लोणी यांनी शंकर पार्वतीचे लग्न, बेलाचे महत्व, भस्माचे महत्व, बारा ज्योतिर्लिंगाची माहिती, श्री गणेशजी चा जन्म, कार्तिकी स्वामी चा जन्म अशी खूपच छान शिवपुराण सांगितले .व शेवटचे काल्याचे किर्तन ह. भ. प.ज्ञानोबा माऊली महाराज आरबुजवाडीकर यांचे काल्याचे किर्तन, 'पाहतां गोवळी। खाय त्याची उष्ठावळी।। करिती नामाचे चिंतन। गडी कानोबाचे ध्यान।। आली द्यावी डाई। धावे वळत्या मागे गायी।। एके ठायी काला। तुका म्हणे भाविकाला।। अशा संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगावर काल्याचे किर्तन करताना कान्होबाचे सवंगडी त्याच्या नामाचे चिंतन करत होते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे. गाईचे रक्षण करावे. म्हणून आपल्या मुखात देवाचे नाव असले तर देव आपली सर्व परी मदत करतो. संकट दुर करतो. देवाने प्रेमा पोटी, भक्ती पोटी, उष्टे ही खाल्ले. गाईचे भक्ताचे रक्षण केले. काल्याचा सुख सोहळा स्वर्गी नाही. काला नाही ब्रह्मदिका, देवलोकी काला नाही म्हणून देव लोकांनी वेगवेगळे रूप धारण करून पृथ्वीतलावर आले तरी पण त्यांना काला भेटला नाही. म्हणून आपण व्यसन सोडलं पाहिजे .प्राणी मात्रावर दया दाखवली पाहिजेत. झाडाचे रक्षण केलं पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाचा द्वेष न करता बंधू भावांनो प्रेमानं मायन राहील पाहिजेत. आपण एकमेकाचे पाय न वोडता डुबणाऱ्याला हाताचा आधार देऊन वर काढले पाहिजेत. एकमेकाची मदत केली पाहिजेत. आपल्या सोबत काही येणार नाही .आपले कर्म ,आपली कीर्ती उरणार आहे. असं खूप छान कीर्तन रुपी सेवेतून भक्त गणाला ह. भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज आरबुजवाडीकर यांनी सांगितले.
संत ज्ञानोबा माऊली प्रतिमेची व ग्रंथाची मिरवणूक पालखी सोहळा, पाऊले, नित्य भजन ,हरिपाठ, काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण ,लक्ष्मण शक्तीचा भव्य दिव्य आसा कार्यक्रम, शिवपुराण, सात दिवस कीर्तने व महाप्रसादाचे कार्यक्रम हकनकवाडी नगरीमध्ये जणू काही पंढरपूर अवतरले होते. हकनकवाडी मध्ये भक्तगणाची दिवाळीच होती. 'संत आले घरा तोची दिवाळी दसरा' अशा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यात विशेष गावकऱ्यांनी हकनकवाडी युवाशक्तीचे आभार मानले. कारण त्यांनी भोजणाची, पाण्याची, बैठकीची,स्वछतेची सोय, युवाशक्तीने कुशलतेनी केली. ज्याने ज्यानेकार्यक्रमात सेवा दिली त्यांचेही या ठिकाणी हकनकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.


0 टिप्पण्या