मग दारुच्या पेट्यांच्या पेट्या अवैधरित्या विकणा-यावर कारवाई का नाही ?
हाळी-हंडरगुळी येथील जनतेचा सवाल..
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-वरिष्ठांच्या आदेशानुसार सपोनि.सुनील गायकवाड यांनी वाढवणा,हंडरगुळी ठाणे व चौकीच्या हद्दीमध्ये गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ विक्री, वाहतूक व साठवण करणा-यांवर कारवाईचा सपाटाच लावला असून या सपाट्यात तीस लाखांचा गुटखा,२वाहनांसह ४ जणांना ताब्यात घेतले आहे.म्हणुन वाढवणा,वायगाव,हाळी,हंडरगुळी तील पान,सुपारी विक्रेत्यां - मध्ये *खाकी* ची चांगलीच दहशत बसली असून अनेकांना लातुरचे तत्कालीन *सिंघम* तथा आयपीएस.पोलिसाधिकारी निकेतनजी कदम यांच्या धडाकेबाज कार्याची राहुन,राहुन आठवण येते.
तसेच या धाडसञाबद्दल वाढवणा पोलिसांचे सर्वञ कौतूक व स्वागत होत आहे.
माञ,किरकोळ विक्रीचा परवाना असताना सुध्दा हाळी (ता.उदगीर) येथील दुकाणदार रोज अंदाजे १५ ते २० पेट्या देशी दारुची अवैध विक्री करतो कसा व कुणाच्या आर्शिवादाने?
तेंव्हा १७५ एम.एल.च्या २,४ बाटल्या जप्त करुन त्या विक्री करणा-या व्यक्तीवर अवैध दारु विक्रीचा गुन्हा दाखल करणारे तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणा-या टप-यांवर धडाकेबाज कारवाई करणारे परवाना नसताना ही दारुच्या पेट्यांच्या पेट्या अवैधरित्या विकणा-या हाळी येथील देशी दारु दुकाणदारावर कारवाई का करत नाहीत?असा सवाल कारवाईच्या धास्तीने धंदा बंद केलेल्या हाळीहंडरगुळी येथील कांही टपरीधारक व सुज्ञ जनतेतून चर्चीला जात आहे.
तसेच लवकरच याबाबत कारवाई करतील!
अशी आशा हाळीकरांना वाटते.
वरिष्ठ अधिका-यांनी अवैध धंद्याविरुध्द उघडलेल्या मोहिमेच्या पार्श्वभुमीवर वाढवणा व हंडरगुळीचे पोलिस गत कांही दिवसा पासुन डोळ्यात तेल घालुन व विश्वासु बातमीदाराच्या मदतीने गुन्हेगार आणि अवैध धंदेविरोधी मोहिम अधिक कडक केली असून अवकाळी पावसाचा तसेच उन्हाचा तडाखा वाढतोय, तरीही या भागात गुटखा व सुगंधीत तंबाखुजन्य तत्सम पदार्थांची विक्री,वाहतूक व साठवण करत असलेल्यांना कायद्याचा तडाखा देत असल्याने टपरीधारकांनी ठरावीक वेळेनंतर बंदचा स्वयंप्रेरणेने निर्णय घेतला म्हणुन परिसरात बहूतांश टप-या बंद दिसतात. प्रतिबंधीत असलेला गुटखा वाहतूक करणा-या वाहनां सह ३० लाखांचा मुद्देमाल आणि ४ आरोपींना ताब्यात घेतले.आणि या कारवाया दि.३० मार्च व १ एप्रील रोजी वादळी वा-यात व अवकाळी पावसात केले म्हणुन पोलिसांच्या धैर्याचे कौतूक होत असलेतरी पहाटे ५ते६ वा.उघडणा-या तसेच किरकोळ विक्रीचा परवाना असतानाही रोज ठोक मध्ये उघड-उघड पेट्यांच्या पेट्या दारु विक्री करणा-या हाळी येथील देशी दारु दुकाणदारावर कारवाई का करत नाहीत? तो गब्बर आहे म्हणुन का?
असे सवाल टपरीधारक व सुज्ञ हाळीकरांतुन चर्चीले जातात. म्हणुन गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर कारवाई करणारे अवैध,विनापरवाना पेट्यांच्या पेट्या दारुची खुलेआम विक्री करणा-या हाळीच्या देशी दारु दुकाणावर कारवाई करणार का नाही? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या