विरुर स्टेशन येथील ग्रामपंचायत सरपंच्याचा भोंगळ कारभार
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख व गावचा प्रथम नागरिक असतो. गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी, ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या सभांचे अध्यक्षपद भूषवणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधा पुरवणे ही सरपंचाची मुख्य कर्तव्ये आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत विरुर स्टेशन येथील सरपंच यांचा मात्र अजबच कारभार असल्याचे दिसुन येत आहे.
सरपंच यांनीच चक्क विभागाच्या गोदामाचे कुलूप तोडून तेथील शासकीय बांधकाम साहित्याचा विनापरवाना वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप नोटीसमध्ये नमूद करण्यात आला आहे.
या संदर्भात यापूर्वीही संबंधितांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यावर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून शासकीय मालमत्तेचे नुकसान, अनधिकृत वापर तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
नोटीसमध्ये संबंधितांना सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कोणतीही पुढील सूचना न देता अनधिकृत बांधकाम हटविणे, शासकीय साहित्याची वसुली करणे तसेच फौजदारी कारवाईसह कठोर प्रशासकीय पावले उचलण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणाची पुढील कारवाईकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या