Ticker

6/recent/ticker-posts

मय्यत लाभार्थ्यांच्या नावाने बोगस बिले काढुन करोडो रुपयांची लुटमार

पाच तहसीलदार सह अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुध्द होणार गुन्हा दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : मय्यत लाभार्थी यांच्या नावाने बोगस व बनावट बिल्ले, पैसे  ,काडुन करोडो रुपये लुटमार करना-या पाच तहसीलदार सह अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध लवकरच FIR दाखल होणार.

दिनांक २९ / ०४ / २०२६ ला वरोरा न्यायालयात सुनावणी झाली असून दिनांक ६/५/२०२६ रोजी प्रकरण आदेशा करीता येणार माहिती अपिलार्थी विनोद खोब्रागडे यांनी दिली आहे.

क्रिमीनल केस नंबर ४४/२०२५ असुन इंटरनेट वर १ ते १४ आरोपीची नावे उपलब्ध आहेत
नुकतेच वरोरा कोर्टाने रेल्वेच्या कार्यकारी अभियंता सिद्धार्थ गुप्ता यांच्या सह १२ अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल फौजदारी खटल्यात मुख्य आरोपी सिद्धार्थ गुप्ता विरुद्ध, कोर्टाचा आदेशानुसार अनेक कलमानुसार FIR दाखल झाला आहे.

महसूल विभागात प्रचंड खळबळ 

विनोद खोब्रागडे पटवारी तथा सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनीच वरिल दोन्ही फौजदारी खटला वरोरा न्यायालयात दाखल केले होते. एका प्रकरणात दिनांक ८/४/२०२६ रोजी आदेश पारित झाला असून FIR दाखल झाला आहे,तर दुसरा प्रकरणात आज विनोद खोब्रागडे यांनी हेरींग युक्तिवाद केला असून  लवकरच दुसरा गुन्हा दाखल होणार आहे.

*काय आहे नेमके प्रकरणं*

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील तहसीलदार यांनी,सन २०१७ पासून २०२५ पर्यत मय्यत लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना यांच्या नावाने बोगस, बनावट, खोटे,बिल काडुन मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची लुटमार ९ वर्षापासुन करीत होते. एका वरिष्ठ लिपिक  यांच्या मुलीच्या खात्यात १०,४६,०००/- लाख रुपये २०२२ मध्ये जमा झाले पण त्यांनी २०२५ पर्यत सांगितले नाही व ही बाब लपवून ठेवली होती. याबाबत विनोद खोब्रागडे यांना  माहीती मिळताच प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते पैसे शासनाला भरण्यास गेले असता तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी ३४,४६,०००/-लाख भरनण्यास सांगितले व त्यांनी एका दिवसात एवढी रक्कम भरली आहे. मात्र त्या लिपीकाने, अनेक तहसीलदार जिवती यांनी सुद्धा रक्कम उचल केली आहे असे सांगितले मात्र एकाही तहसीलदार विरुद्ध FIR दाखल केले नाही व प्रकरण जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दाबुन टाकले होते.
अखेर विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, महाराष्ट्र शासन यांना गंभीर रिपोर्ट केली मात्र एकानेही या प्रकरणात फारसा अँक्शन घेतली नाही.
लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा हा प्रश्न लक्षवेधी सूचना लावुन अधिवेशनात मांडला नाही
अखेर विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी पाच तहसीलदार, एक उपविभागीय अधिकारी राजुरा, दोन तत्कालीन आजी माजी जिल्हाधिकारी चंद्रपूर, दोन वरिष्ठ लिपिक व पोलिस प्रशासन असे १ ते १४ आरोपी विरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे.

सदर प्रकरणात अनेक वेळा सुनावणी झाली, काल सुद्धा सुनावणी दरम्यान अनेक सुप्रीम कोर्टाचे जजमेंट,व उच्च न्यायालयाचे जजमेंट यांना  विनोद खोब्रागडे यांनी अनेक दाखल केलेले FIR पुरावा कोर्टात दाखल केले आहे व तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात केली आहे.

सदर प्रकरण आदेशा करीता लागलेले असुन लवकरच पाच तहसीलदार सह अनेक अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अशी माहिती विनोद खोब्रागडे पटवारी तथा सामाजिक कार्यकर्ते, तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा जनप्रतिनिधी तथा RTI जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांनी एका पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या