आनंदलीन महंत श्री श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती गुरु अच्युतजी भारती महाराज(मालक)
यांचे षोडशी महापूजेचे आयोजन
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर - हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील दत्तात्रेय संस्थान शिखर चे महंत श्री श्री श्री १००८ महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे ४ एप्रिल रोजी महानिर्वाण झाले. दिनांक ५ एप्रिल रोजी विविध आखाड्याचे प्रतिनिधी साधू संत व महामंडलेश्वर व लाखो भाविकांच्या व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत महंत श्री श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे उतराधिकारी म्हणून महंत श्री श्री श्री १००८ महंत डॉ. धनेश्वरजी भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज(मालक) सन्याशी परंपरेनुसार व दत्तशिखर संस्थानच्या नियमानुसार यांची निवड करून विधिवत गादीवर विराजमान करण्यात आले व श्री श्री श्री १००८ महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांना सन्याशी परंपरेनुसार व दत्तशिखर संस्थानच्या नियमानुसार समाधिस्त करण्यात आले.
त्यानिमित्याने दत्तात्रेय संस्थान शिखर माहूरगड येथे नवीन महंत श्री श्री श्री १००८ महंत डॉ. धनेश्वरजी भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज(मालक) यांचे आदेशानुसार दि. १९ एप्रिल अक्षय तृतीयाच्या दिनी आनंदलीन महंत श्री श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे षोडशी महापूजेचे व भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी
१) सकाळी ६ वा. तीर्थस्थापना दत्तनामाचा गजर (एक्का)
२) सकाळी १०:०० ते १२ :०० सत्संग
३) दुपारी १२:०० वा.पासून षोडशी महापूजा व महाप्रसाद
४) संध्याकाळी ८:०० वा.पासून आनंद दत्त १२८ सवा खंडी महापूजा
दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी
सकाळी काकडा आरती व सांगता
याप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सत्संग जुन्या आखाड्याचे आचार्य महामांडलेश्वर परमहंस परीव्रजकाचार्य जुना पीठाधीश्वर श्री श्री श्री १००८ स्वामी आवदेशानंद गीरीजी महाराज हे घेणार आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज, श्रीपंचकस्नान जुन्या आखाड्याचे वरिष्ठ सभापती अध्यक्ष श्रीमंत प्रेमगीरीजी महाराज, वर्तमान श्री पंचकस्नान जुन्या आखाड्याचे अध्यक्ष मोहन भारतीजी महाराज, यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
हा कार्यक्रम परमआदरणीय वरिष्ठ सभापती पंचकस्नान जुन्या आखाड्याचे अध्यक्ष उमाशंकरजी भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होणार आहे. तसेच या कार्यक्रमास देशभरातून साधू संत व लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. सर्व भाविक भक्तांनी सत्संग व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दतात्रेय संस्थान शिख्रर माहूरगड चे सर्व साधू संत मंडळ व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.


0 टिप्पण्या