Ticker

6/recent/ticker-posts

घवघवीत यशाची उज्ज्वल परंपरा कायम


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-पीएम श्री. जि. प. हायस्कूल साकोली या शाळेने सन २०२५-२६  च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सदर स्कॉलरशिप परीक्षेत वर्ग पाच मधून शंतनु नितीन थेर २१० गुण, रुचिता राजेश डोंगरवार १७० गुण, आर्या भगवान उके १६२ गुण, धैर्या महादेव मानकर १५६  गुण, कृत्तिका गुणीलाल बागडकर १४८ गुण, यशश्री अनुराग चांदेवार  १३८ गुण, मिताली प्रकाश लन्जे १३० गुण मिळवून यश प्राप्त केले. तर पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल साकोली येथील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मधून बादल विश्वनाथ हेमने २०४ गुण,  डुनेश्वरी उमेशचंद्र नगरकर १५० गुण, गीत वासुदेव मौजे गुण १४६ , हर्षल दिनेश तरोणे १३० गुण, हेमंत संजय रुखमोडे  १४० गुण, माही भगवान ओके १४६  गुण, नव्या हरिचंद मल्लेवार १५६ गुण, पूर्वजा चंद्रशेखर कापगते १५० गुण, रोहन रविशंकर समरीत १५८ गुण, सुशील उत्तम मेश्राम १७८ गुण, स्वप्निल विजय शिवणकर १७० गुण, उत्कर्ष सतीश इठोले  १६४ गुण, यशश्री नरेंद्र वलथरे १५४ गुण मिळविले. शाळेची सातत्यपूर्ण यशाची परंपरा ही मुख्याध्यापकांचे नियोजन, मार्गदर्शक शिक्षकांचे अथक प्रयत्न, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांचे सहकार्य आणि पालकांचा विश्वास यामुळे अधिक भक्कम होत आहे. या यशासाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका वृंद अमित डोये, बाळू चव्हाण, कुमुद नाकाडे, आशा चौधरी, डॉ. मनोज बागडे, मनोहर भैसारे, नरेश बालबुद्धे , धनराज मसराम, मुकेश गुरनुले, इमरान तुरुक, पूनम कुंभारे उपस्थित होते. यांचे परिश्रम आहेत. घवघवीत यशाची परंपरा शाळेने कायम राखल्याबद्दल साकोलीतील पालकांनी मुख्याध्यापक धर्मेंद कोचे, शाळा समिती अध्यक्ष व सदस्य  सर्व सदस्य तसेच सहकार्य करणारे पालक आभार व्यक्त करण्यात आले.
-----------------------------------------------

विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाला, पालकांच्या सहकार्याला व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाला मिळालेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे.

धर्मेंद कोचे. मुख्याध्यापक, 
जिल्हा परिषद हायस्कूल साकोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या