भद्रावतीकरांनो लक्ष द्या: दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत मुख्य पाईपलाईन जोडणीचे अंतिम टप्प्यातील काम हाती घेण्यात आल्याने भद्रावती शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. नगर परिषद प्रशासनाने याबाबतची सूचना जारी केली आहे.
नगर परिषदेच्या माहितीनुसार, बुधवार दि. 20 मे 2026 ते गुरुवार दि. 21 मे 2026 या दोन दिवस संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहील. वडीव पाणीपुरवठा योजनेच्या इंटेक वेल कनेक्टिंग मेन पाईपलाईन जोडणीचे काम या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
*नागरिकांना आवाहन*
काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी व नगर परिषद अध्यक्षांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या दोन दिवसांत नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------------
🚱 भद्रावती शहरात पाणी अलर्ट! 🚱
अमृत 2.0 योजनेच्या कामामुळे 20 मे बुधवार ते 21 मे गुरुवार, दोन दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा. अपव्यय टाळा, सहकार्य करा. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा


0 टिप्पण्या