Ticker

6/recent/ticker-posts

बच्चू कडू!मुकद्दर का शिकंदर!


बच्चू कडू!मुकद्दर का शिकंदर!

          बच्चू कडू नावाचा माणूस ओळखत नाही असा कोणी बुवा आणि बया महाराष्ट्रात नाही.बंडखोर रॉबीनहुड, वासुदेव बळवंत फडके,लाला लजपतराय असा शिघ्रकोपी माणूस.जे खटकले त्याच्या विरोधात उद्या नाही आजच लढायचे.ते पण स्वताच्या शेपटीला चिंध्या बांधून,आग लावून लंका जाळून टाकायची.कल किसने देखा?कल करे सो आज! पगार घेऊन काम नाही करीत त्याच्या दोन थोबाडीत मारणारा माणूस.खुद्दार माणूस.मुकद्दर का सिकंदर.हम जहां खडे होते है ,वहांसे लाईन शुरू होती है! म्हणून तर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना झोडपून काढण्याचे आम्ही समर्थन करतो.आधिकाऱ्यांना मारणे हा शोक नाही, धुडगूस नाही,स्टंट नाही!बहादुरी आहे.लोकांना आवडते.आजची काळाची गरज आहे.बच्चू कडूवर तीनशे गुन्हे नोंदवले गेले आहेत.कशाचे आहेत? कोणी बाईला धक्का दिला का?दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला का?चोरी केली का? नाही! पगार घेऊन काम न करणाऱ्या माणसाचा राग आला म्हणून ठोकले.ठोकलेच पाहिजे.याच वृत्ती, प्रवृत्ती मुळे शिवसेना अल्पकाळात लोकांना आवडली होती.बच्चू कडू मुळचे शिवसेनेच.फिरून पुन्हा शिवसेनेतच गेले.
        दिव्यांग आणि शेतकरी यांचा हिरो एक वर्षापासून दुखी होता.तरीपण लढाई थांबवली नाही.तळीराम आणि सुधाकर सारखा दारू पिऊन अड्ड्यावर पडून राहिला नाही.लढला.रस्त्यावर लढला.दिव्यांगांचे मानधन वाढवून घेतले.स्वतंत्र खाते मिळवून घेतले.शेतकऱ्यांसाठी लढला.कर्जमाफी करवून घेतली.वचन फडणवीस यांनी दिले.पण पुर्ण केले बच्चू कडू ने.फडणवीस यांची लाज राखली.तुझे मंत्री अरबो करोडोची चोरी करतात तर शेतकऱ्यांना लाखाची कर्जमाफी दिली पाहिजे.
       विधानसभा निवडणूक हारल्यानंतर बच्चू कडू दुःखी होते.आपण शेतकऱ्यांसाठी इतके लढलो पण चंद पैशात मत विकले.आपल्या लढाईची,कामाची,यशाची कदर केली नाही, शेतकऱ्यांनी!
        जी माणसे पैशांसाठी,दान अनुदान साठी, माफीसाठी तोंड वेंगाळतात ती माणसे कोणत्याही राजकारणाचा ,देशाचा,धर्माचा भाग राहात नाहीत.मार्क्स,एंजिल्स, लेनिन यांनी शेतकरी कामगारांसाठी लढा दिला पण कायम सोबत ठेवू शकले नाहीत.कारण शेतकरी आणि कामगार हा राजकारणाचा पाया,आधार बनू शकला नाही.देशाचा आधारस्तंभ बनू शकला नाही.म्हणून चीन , रशिया कम्युनिस्ट,सोशालिस्ट असूनही एकपक्षीय हुकूमशाही राबवली जाते.शेतकरी आणि कामगार यांच्या भरोशाने भारतातील कम्युनिस्ट, समाजवादी,शेकाप नेते काळाच्या आड गेले.कारण हा वर्ग मतदान करीत नाही,मतविक्री करतो.यामुळेच शरद जोशी, महेंद्रसिंग टिकैत, राजेश टिकैत,राजू शेट्टी,सदाभाऊ खोत,जयंत पाटील,रघुनाथदादा पाटील, विजयकुमार जावंधिया आणि आता बच्चू कडू यांना विसरले.राजाकडे भाकरी मागायला आलेला माणूस राजाचा नसतो.तो भाकरीचा असतो.तो बच्चू कडूचा तरी कसा होणार?
        आम्ही जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी लढतो.जिंकतो.शेतकरी फायदा घेतो.पण ताबडतोब विसरतो.तू कोण आणि मी कोण? तुम्ही दिले,आता मला जो देईल त्याच्याकडे जावे लागेल.यालाच शूद्र प्रवृत्ती म्हणतात.कितीही दिले तरीही झोळी भरत नाही.पोट भरले तरीही भूक मिटत नाही.भाकरी मागितली आणि सोने दिले तरीही गरीबी हटत नाही.कारण गरीबी शाप नाही, गरीबी पाप आहे.बुद्धी , ज्ञान आणि निती अभावी हे पाप घडते.शेतकऱ्यांमधे याचा अभाव आहे.तो पर्यंत शेतकरी समर्थ आणि स्वावलंबी होऊ शकत नाही.असे अनेक शरद जोशी,राजू शेट्टी,बच्चू कडू येतील जातील पण शेतकरी जेथे आहे तेथेच खितपत पडून राहाणार आहे.कारण गरीबी शाप नाही.अनितीमुळे घडलेले पाप आहे.
     शिकंदरको लोगोने हराया!मगर वो हारा नहीं,वो मरा नहीं!शिकंदर जिंदा है!वो खुद्दार है! अपनी मुकद्दर खुद बनाता है!

... शिवराम पाटील 
प्रहार जिल्हाध्यक्ष जळगाव.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच 
जळगाव.
३०/४/२०२६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या