Ticker

6/recent/ticker-posts

लेंडाळा तलावात हजारो मासे मृत; मच्छीमारांवर उपासमारीचे संकट


सौंदर्यीकरणासाठी पाणी कमी केल्याने प्राणवायूअभावी मृत्यू; 10-15 लाखांचे नुकसान, तलावात दुर्गंधी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती: शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या व शेकडो मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या लेंडाळा तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावाच्या सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी पाण्याचा साठा कमी केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध झाला असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाकरिता तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले. त्यानंतर अनेक मासे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. उर्वरित जलसाठा अत्यल्प राहिल्याने तलावात प्राणवायूची कमतरता निर्माण झाली. परिणामी हजारो मासे मृत्युमुखी पडत असून तलाव परिसरात दुर्गंधीयुक्त चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शिल्लक मासे पकडणेही अत्यंत कठीण झाले आहे.

या घटनेमुळे पारंपरिक मत्स्य व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे. शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांच्या मत्स्य संपदेचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

----------------------------------------------
भद्रावतीत पर्यावरणाचा बळी!

लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी पाणी कमी केल्याने हजारो मासे मृत. प्राणवायूअभावी तडफडून मृत्यू. 10-15 लाखांचे नुकसान. शेकडो मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर संकट. तलावात दुर्गंधीचे साम्राज्य.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या