Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हा बैठक संपन्न

प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती :  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची चंद्रपूर जिल्हा बैठक रविवारी भद्रावती येथे किशोर खांडाळकर यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य व विचारांवर मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी नेते तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची ध्येयधोरणे राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या तसेच संघटनेची तालुका व गावपातळीवरील बांधणी यावर सविस्तर चर्चा झाली. "प्रत्येक गावात समता परिषदेची शाखा असावी" असा निर्धार जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी यांनी व्यक्त केला.

जिल्हा महिला अध्यक्षा अनिता बोंढे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात महिला आघाडीची बांधणी मजबूत करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहण्याचे सांगितले.

या बैठकीत पुढील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सुनिता किशोर खंडाळकर जिल्हा उपाध्यक्षा, महिला आघाडी, चंद्रपूर, सोनू योगेश चौधरी जिल्हा संघटक, श्रुतीका शाम जुनघरे भद्रावती तालुका महिला महासचिव आणि जयश्री गणेश बत्तीनवार भद्रावती तालुका सचिव यांची नियुक्ती करण्यात आले.

नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्षा सुनिता खंडाळकर यांनी भद्रावती तालुक्यातील प्रत्येक गावात समता परिषद स्थापन करून महिला आघाडी अधिक बळकट करण्याचा संकल्प बोलून दाखवला.

या बैठकीला किशोर खंडाळकर, राजू गैनवार, मंगेश कांबळे, स्वावेद राऊत, अशोक सावरकर, जिल्हा महिला महासचिव सुशीला मत्ते, भद्रावती तालुका अध्यक्षा संगीता टोगे, जिल्हा उपाध्यक्षा अनिता बोबडे यांच्यासह अनेक समता सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या