प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती :भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर विरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून भद्रावती येथे दि. 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर भव्य धरणे प्रदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सहसचिव तथा माजी नगरसेवक कॉम्रेड राजू गैनवार हे करणार आहेत. वीज ही सर्वसामान्य नागरिकांची मूलभूत गरज आहे. मात्र स्मार्ट मीटर बसविल्यामुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा सपाटा सुरू असून हा प्रकार अन्यायकारक आहे. यामुळे वीज ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे, असा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉम्रेड राजू गैनवार, कॉम्रेड अरविंदकुमार कॅप्टन, कॉम्रेड दिलीप वनकर, कॉम्रेड शेख शकील यांनी केले आहे.


0 टिप्पण्या