प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांची ‘वानवा’; इंचार्ज डॉक्टरांचा ‘मोबाईलवरून’ कारभार !!
चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर:-ग्रामीण भागातील जनतेला हक्काची आणि मोफत वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) सुरू केली.मात्र, सध्या हंडरगुळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.या केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठी वानवा असून, येथील इंचार्ज डॉक्टर महोदय चक्क उंटावरुन नव्हे तर 'मोबाईलवरून' आणि परमानंट असलेले डाॅक्टर "जिल्हा आरोग्याधिकारी" कार्यालयातुन या प्रा.आरोग्य केंद्राचा कारभार हाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे ग्रामीण रुग्णांना देवाच्या स्वाधीन सोडण्याची वेळ आली आहे.
रुग्ण वाऱ्यावर...
मिळालेल्या माहितीनुसार, या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अनेक गावांमधील नागरिक दररोज उपचारासाठी येथे येतात.म्हणुन रोजची ओपीडी २००ते२५०० तसेच बाजारदिनी २५०० ते ३५० ओपीडी असते.आणि हा सगळा भार गत कांही महिण्यापासुन 'टेंपररी' असलेले डाॅक्टर एस.एस.काळवणे हेच हाकताना दिसतात. मात्र,गेल्या कांही वर्षापासून या केंद्रात परमानंट असलेले वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.केंद्राचे मुख्य इंचार्ज डॉक्टर हे आठवड्यातून एखाद-दुसऱ्या दिवशी हजेरी लावतात आणि राहिलेल्या दिवसांचा कारभार थेट घरबसल्या किंवा खाजगी क्लिनिकमधून ‘मोबाईल फोन’द्वारे चालवतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांना फोनवरूनच सूचना देणे,औषधोपचारांचे फर्मान सोडणे आणि कागदोपत्री सर्व आलबेल दाखवणे, असाच काहीसा प्रकार येथे सुरू आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता; औषधोपचाराचा बोजवारा
केवळ डॉक्टरच नव्हे, तर या केंद्रात परिचारिका , औषध निर्माता आणि वॉर्ड बॉय यांचीही पदे रिक्त आहेत किंवा खुप वर्षापासुन असलेले २ कर्मचारी वारंवार दांड्या मारतात.
रुग्णांची परवड:कारण,गत कांही महिण्यापासुन येथे २४x७ सेवा बजावणारे डाॅक्टर हे "बाॅंडींग" म्हणजे "टेंम्पररी" आहेत.तरी ही ते २४x७ सेवा देत असल्याने त्यांच्यावर आयपीडी व ओपीडी सह डिलिवरी,शस्ञक्रिया,पी.एम.अपघात,साप, विंचू चावलेले रुग्ण तसेच एमएलसी या सारख्या कामांचा ताण "टेंपररी" असलेले डाॅ.एस.एस. काळवणे यांच्यावर पडतोय,तरीही डाॅ.काळवणे हे "ईश्वर सेवा" समजुन 'रुग्ण सेवा' बजावताना दिसतात.माञ,येथे परमानंट म्हणुन नियुक्ती असलेले डाॅक्टर कधीच दिसत नसल्याने तसेच मुख्य 'ईन्जार्ज' असलेले डाॅक्टर फोनवरुनच कारभार बघत असल्याने वरिष्ठांचा यांना "अर्थपुर्ण' पाठींबा असू शकतो.
अपुऱ्या सुविधा: तातडीच्या उपचारासाठी लागणारी प्रथमोपचार औषधेही अनेकदा उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्णांना मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
नागरिकांचा संतप्त सवाल...
आम्ही गरीब लोकांनी उपचारासाठी कुठे जायचे?परमानंट असलेले डॉक्टर येथे कधीच जागेवर नसतात.. परिचारिका विचारतात, 'काय झाले?' आणि नेहमी त्याच त्या काळ्या,पांढ-या लाल,पिवळ्या रंगाचे गोळ्या,इंजेक्शन देतात. डिजिटल इंडिया झाला म्हणून काय ईन्चार्ज डॉक्टरांनी पण डिजिटल (मोबाईलवरून) तपासणी करायची का?
हामजा शेख,ग्रामस्थं,हाळी..
मी,येथे जाॅईन झालो तेंव्हा पासुन आहे त्या सोयी सुविधांच्यामाध्यमातुन २४x७ रुग्णांची सेवा करत आहे.तसेच येथे कशा,कशाची गरज आहे.याची पुर्ण माहिती वरिष्ठांना व पुढा-यांनाही आहे.
डाॅ.एस.एस.काळवणे,मेडिकल आॅफीसर...
वरिष्ठ अधिकारी डोळेझाक का करत आहेत?
या सर्व प्रकारामुळे रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.'फोनवरुन' कारभार हाकणा-या 'ईन्चार्ज' तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातुन कारभार बघणा-या 'परमानंट' डाॅक्टर यांना वरिष्ठांचे व गावपुढा-यांचे ही 'अर्थपुर्ण" अभय आहे का? अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत.
आंदोलनाचा इशारा...
या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत आणि हलगर्जीपणा करणाऱ्या इंचार्ज डॉक्टरवर निलंबनाची कारवाई करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.येत्या ८,दहा दिवसात आरोग्य केंद्राचा कारभार न सुधारल्यास परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने आरोग्य केंद्राला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत गावकरी आहेत.
या बाबत जिल्हा आरोग्याधिका-याशी बोलून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सचीन राठोड यांनी दिली.तर जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.शिंदेंना वारंवार फोन करुन ही "रिस्पाॅन्स' दिला नसल्याने जिल्हा आरोग्य अधिका-याच्या कामांबद्दल शंका व्यक्त होते.


0 टिप्पण्या