चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून वाहतूक केल्या जाणाऱ्या १२ गोवंशांची वाढवणा बु. पोलिसांनी सुटका केली आहे.पोलिसांची चाहूल लागताच दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून,पोलिसांनी वाहनासह ५ लाख ९० हजारांची १२ बैलं आणि १० लाख रुपयांचा लिलेंड कंपनीचा टेंम्पो असा एकुण १५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.माञ,दोन आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत.
या प्रकरणी एम.डी.वच्चे पो.काॅ.यांनी फिर्याद दिल्यावरुन वाढवणा पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मद बबलू खुदबोद्दीन रा.कामठाना ता.व जि. बिदर व आरोपी नं.२) सुर्यकांत व्यंकटराव सुर्यवंशी रा.मंगरुळ ता.जळकोट यांच्याविरुध्द गुरनं. ११२/२६ कलम. ५,५(अ),गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा,सह कलम ११ (ज),११ (१) क,११ (१) घ,११ (१) ड,छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम- २८१ बीएनएस.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास हेकाॅ.शिवाजी केंद्रे करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वाढवणा पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या वर्णनाचा एक टेंम्पो संशयास्पदरित्या वाढवणा पाटीवर आला असता तो थांबवण्याचा इषारा करताच चालकाने वाढवणा पाटीवरुन गावाकडे जाणा-या रोडवर हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पलटी केला आणि त्यातील चालकासह अन्य एक असे २ आरोपी फरार झाले.
१२गोवंशांची सुटका
पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या वाहनाची झडती घेतली असता, त्यांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. वाहनामध्ये एकूण १२ गोवंश (बैलं) अत्यंत निर्दयीपणे,कोणतीही चारा-पाण्याची सोय न करता,दोरीने आखूड बांधून डांबण्यात आले होते.या जनावरांची कत्तलीच्या उद्देशानेच वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास सुरु.....
पोलिसांनी या कारवाईत १२ गोवंशांसह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत १५ लाख ९० हजार रुपये आहे.
या प्रकरणी वाढवणा पोलिसांनी फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून,लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास सपोनी. सुनील गायकवाड, पोउपनी.प्रवीण हालसे तसेच तपासीक अंमलदार एस.आर.केंद्रे यांनी व्यक्त केला आहे.


0 टिप्पण्या