भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडी यांची मागणी
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : शहरातील दोन महिलांनी नवजात बालक विकण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची सखोल चौकशी करून मुख्य सुत्रधाराला अटक करण्याची मागणी आज भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडी च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना करण्यात आली.
या पूर्वी सुद्धा या महिलांनी अशा प्रकारचे गुन्हे केले असू शकतात त्यामुळेच या प्रकरणासाठी एस.आय.टी. स्थापन करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना करण्यात आली आहे. सदर महिलांचे धागेदोरे इतर शहरात सुद्धा जुळलेले असू शकतात, त्यामुळे या महिलांना जास्ती जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवून सदर प्रकारचे गांभीर्य लक्षात घेता यांच्या कडून अधिकाधिक माहिती मिळवावी अशी विनंती भाजपा महिला आघाडी कडून करण्यात आली.
यावेळी नगरसेविका सुनीता जयस्वाल,नगरसेवक रवी लोणकर नम्रता आचार्य ठेमस्कर, शीला चव्हाण, माया उईके, मुग्धा खाडे, मनिषा महातव, समिस्ता फारुकी, हिना शेख, जयश्री आत्राम यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या