Ticker

6/recent/ticker-posts

वीज पडून शेळीपालकाचा जागीच मृत्यू! वायगांव(ख) हादरले

शेळ्या चारून परत असताना अंगावर वीज कोसळली; पत्नी-मुलगा असहाय्य


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा: वरोरा तालुक्यातील वायगांव(ख) येथे आज सायंकाळी 5 वाजता मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना वीज पडून शेळीपालक प्रभाकर किसनराव मन्ने वय 53 यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सायंकाळी 5 च्या सुमारास परिसरात हवामानात अचानक बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी प्रभाकर मन्ने गावापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या नाल्या जवळ शेळ्या चार असता अचानक वीच पडुन प्रभाकर मन्ने नाल्यात कोसळुन मृत्यू मुखी पडला. 

हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने शेगांव पोलीस स्टेशनला माहिती दिली. शेगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या दुर्घटनेत प्रभाकर मन्ने यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेळीपालन हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग होता.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी शासनाकडून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीतील मदतीचे निकष लागू करून तातडीने मदत द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

_______________________________________

दुर्दैवी: वीज पडून शेळीपालकाचा मृत्यू

वरोरा तालुक्यातील वायगांव(ख) येथे आज सायंकाळी 5 वा. मुसळधार पावसात शेळ्या चारून परतणाऱ्या प्रभाकर मन्ने वय 53 यांच्या अंगावर वीज पडली. जागीच मृत्यू. पश्चात पत्नी-मुलगा असहाय्य. ग्रामस्थांची मागणी - शासनाने तातडीने मदत द्यावी. वादळ-विजेत शेतात जाणे टाळा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या