Ticker

6/recent/ticker-posts

चिचोलीत वन्यप्राणी घोरपडीची अवैध शिकार! 3 मजुरांना ताब्यात

घरी मांस शिजवताना वन विभागाच्या छाप्यात पकडले; लोखंडी काती जप्त


राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती: 26 जून 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता भद्रावती तालुक्यातील मौजा चिचोली गावात वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीचा प्रकार उघडकीस आला. काही इसमांनी घोरपडीची शिकार करून कच्चे मांस शिजवून खाण्यासाठी घरी आणले असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली.

गुप्त माहिती मिळताच  राजन तलमले, विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व  विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक तेंदू चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली  के. डब्ल्यू. धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांच्या नेतृत्वातील पथकाने चिचोलीत धडक दिली.  
व्ही. आर. ठाकरे, क्षेत्र सहायक चोरा, एम. आर. चौधरी, वनरक्षक चिचोली,  के. डी. कांबळे, वनरक्षक गुळगाव व इतर कर्मचारी पंचांसह घटनास्थळी पोहोचले असता वन्यप्राणी घोरपडीचे अवैधरित्या शिकार केलेले कच्चे व शिजले मांस आढळले.

वन विभागाने तातडीने जप्ती कारवाई करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मांसाची तपासणी करून घेतली. या प्रकरणी प्रा.अ.सु.क्र. 09188/229697/2026 दि. 26/06/2026 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला.  
आरोपी 1. निलेश उत्तम राहुलगडे वय 33, आरोपी 2. निखील गणपत श्रीरामे वय 30, आरोपी 3. संतोष गुलाब कातकर वय 52 - सर्व राहणार चिचोली, ता. भद्रावती, धंदा मजुरी यांना कच्चे व शिजले मांस आणि लोखंडी कातीसह ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

________________________________________

चिचोलीत घोरपड शिकारीचा भांडाफोड!

भद्रावती तालुक्यातील चिचोली गावात 3 मजुरांनी घोरपडीची शिकार करून मांस शिजवले. गुप्त माहितीवरून वन विभागाची छापा, घरातून कच्चे-शिजले मांस व काती जप्त. निलेश राहुलगडे, निखील श्रीरामे, संतोष कातकर ताब्यात. वनगुन्हा दाखल. DFO राजन तलमले यांच्या मार्गदर्शनात ACF धानकुटेंची कारवाई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या