Ticker

6/recent/ticker-posts

मेसा येथे बाबा फरीद दर्ग्यावर भक्तांचा महासागर!

मोहरम सहावीचा उत्सव महाप्रसादाने सांगता; हजारो भाविकांनी घेतला लाभ


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 वरोरा : तालुक्यातील मेसा येथे भावीक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा फरीद दर्गा येथे काल दि. 22 मे 2026 रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोहरम सहावीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. हजारोंहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सहावीच्या उत्सवामध्ये भाविकांकडून अर्पण केलेले धान्य व साहित्याचा वापर करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. मंदिराच्या आवारात महाप्रसादासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता व स्वयंपाकाची जय्यत तयारी करण्यात आली होती. विविध स्वयंसेवी संस्थांनी पाण्याची सोय केली होती.
बाबा फरीद दर्गा समितीचे मंडळ, ग्रामपंचायत तथा माटे कृषी केंद्र निलकंठ वरभे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. शेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमाला नथ्थूजी कुळमेथे, निलकंठ वरभे, मनोहर घुमे, राजू दडमल, लोकेश राऊत, प्रमोद कातोरे, महेंद्र मुगले, विजय आंबटकर, अविनाश वरभे, अतुल सोनुने, मिथुन खाटीक, सतीश वरभे, संतोष लोडे, पारस घुमे, महेश कातोरे, विलास वंजारी, अनुप खाटीक, किशोर मगरे, वैभव जिवतोडे, दिनेश किन्नाके, अनिल घुमे, गजानन मुंगले यांच्यासह माटे कृषी केंद्राचे संचालक तथा कर्मचारी आणि गावातील नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होते.

______________________________________

बाबा फरीद दर्ग्यावर भक्तांचा महापूर!  

मेसा येथे मोहरम सहावीचा उत्सव महाप्रसादाने सांगता. भाविकांनी अर्पण केलेल्या धान्यातून हजारोंना जेवण. सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत महाप्रसाद. शेगांव पोलिसांचा चोख बंदोबस्त. निलकंठ वरभे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम यशस्वी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या