सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- अरणगाव ता. जामखेड येथे गेल्या दोन महिन्यापूर्वी सबस्टेशन ला बसवण्यात आलेला नवीन पाच एम. व्ही. के मोठा ट्रांसफार्मर येत्या 4 ते 5 दिवसात बसव्यात यावा या साठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माजी उपसभापती मा. अंकुश ढवळे सह ग्रामस्थांनी घेतली महावितरण अधिकारी यांची भेट.
त्यावेळी अंकुश ढवळे म्हणाले कि, अरणगाव, पारगाव, डोणगाव, पाटोदा, भवरवाडी या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसापासून सिंगल फेज लाईट (विजेचा पुरवठा शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी दिवसाची लाईट द्या अशी मागणी ढवळे यांनी केली आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे आणि हल्ल्यामुळे परिसरात मोठी चिंता व्यक्त होतं आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात विजेचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही व ट्रान्सफॉर्मर चालू केला नाही तर ग्रामस्थांसोबत उपोषण करणार असल्याचा ढवळे त्यांनी सांगितले.


0 टिप्पण्या