सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- दिल्ली येथील जंतर - मंतर वरील केंद्र शासनाच्या विरोधात व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुषपने लाठीचार्ज करण्यात आला.
याच्या विरोधात व विद्यार्थी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बहुजनहृय सम्राट ,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती तो आदेश माणून अरणगाव ता. जामखेड मध्ये आज गुरुवार दि.23 जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.
व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करण्यात आला.सर्व ग्रामस्थ अरणगाव व पारेवाडी मध्ये कडकडीत बंद पाळून विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवला.
हा बंद जयभीम स्तंभ प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने पुकारण्यात आला होता यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये ॲड प्रवीण ससाणे,बाळासाहेब ससाणे,अशोक ससाणे, जय भीम प्रतिष्ठान अध्यक्ष किशोर ससाणे,रमेश ससाणे,जनार्धन ससाणे,गणेश ससाणे,अरुण ससाणे,महादेव ससाणे, डॉ.रवी ससाणे, प्रा.भागवत ससाणे, विजय ससाणे,दिपक ससाणे, अरुण पवार,बाळासाहेब पवार,विठ्ठल पवार,हनुमंत पवार,रवी पवार,सागर पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या