Ticker

6/recent/ticker-posts

ई पीक पाहणी सहायकांच्या समस्या तात्काळ सोडवा याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन

समस्यांची दखल न घेतल्यास काम बंद आंदोलन

,

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा- ई-पिक पाहणी सहाय्यक हे तुटपूंज्या मानधनावर काम करीत आहेत .सध्या ई-पिक पाहणीचे 100% कार्य हे सहाय्यका मार्फत करण्याचे शासणामार्फत ठरविण्यात आले आहे .आपल्या तालुक्यामध्ये वेनगंगा नदी, द विविध प्रकारचे नाले आहेत व भरपूर प्रमाणात वनक्षेत्र व बफरझोन लागून असल्याने तसचे मुसळधार पावसामुळे पूर येऊन शेतशिवारात साप व इतर सरपटणारे प्राणी तसेच वन्यप्राणी वावरत असतात. मागील काही काळात आपल्या तालुक्यात वाघाचे हल्ले, अस्वलीचे हल्ले, रानडुकरांचे हल्ले. तसेच सर्पदंशाचे प्रमाण ब-याच प्रमाणत वाढलेले असतांना ई पिक पाहणी सहाय्यकांना जिव धोक्यात घालुन काम करावे लागत आहे करीता तालुक्यातील सर्व ई-पिक पाहणी सहाय्यकांच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत. सर्व ईपीक पाणी सहायकांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात यावे, ई पीक पाहणी करताना च्या कालावधीमध्ये सहायकाचा वन्य प्राण्यापासून अगर अपघातापासून विविधतांनी झाल्यास त्यांचा परिवार उघड्यावर पडेल करिता त्यांना पन्नास लाख रुपये विमा कवच देण्यात यावा, ई पीक करत असताना एखादा अपघात होऊन जखमी झाल्यास सहायकांना पाच लाखापर्यंत शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी, ई पीक पाहणी सहायकांना प्रतिगट पन्नास रुपये व मिश्र पिकासाठी 60 रुपये प्रमाणे मानधन देण्यात यावे, शासनाने प्रतिगट पन्नास रुपये न दिल्यास शेतकऱ्यांकडून प्रतिगट पन्नास रुपये सहायकांना घेण्याची मुभा असावी, जीपीएस प्रणाली मध्ये 20 मीटर लोकेशन वरून 50 मीटर करण्यात यावा, ईपीक पाहणी करणाऱ्या सहायकांना सेफ्टी सूज शासना तर्फे देण्यात यावी, मागील ई पीक पाहणी केलेल्या सहायकांना त्यांच्या कामाचा मोबदला मानधन देण्यात यावा, ॲप मध्ये ,फेस आयडी, जीपीएस सर्वर ,ओपीडी इंटरनेट इत्यादी तांत्रिक समस्या आल्यास त्यासाठी सहायकाला दोस्ती ठरविण्यात येऊ नये, सदर निवेदनाचे सकारात्मक विचार होईपर्यंत व तोच उत्तर मिळेपर्यंत सर्व पीक पाणी सहाय्यक काम बंद ठेवत आहेत करिता शासनाने तात्काळ दखल घ्यावी. च्या मागणीचे निवेदन देण्यात आले. सदर मागण्यांचे निवेदन भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी भंडारा ,उपविभागीय अधिकारी, भंडारा संपूर्ण संपूर्ण इ पिक सहाय्यक भंडारा यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या