Ticker

6/recent/ticker-posts

समाजात अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक :-डी जी रंगारी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -अजय इंटरनेट वायफाय च्या युगात अंधश्रद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पसरवण्याचा काम इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या माध्यमातून होत आहे त्याला आळा बसवायचा असेल व समाजाचे अंधश्रद्धा दूर करायचे असेल व समाजा मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचे असेल तर गावागावात ,कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी जन प्रबोधन करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी कागदराव रंगारी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या सभेत आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून कल्पनाताई सांगोळे यशवंत उपरीकर ,शितल नागदेवे ,विलास करंजेकार , अनिल किरणापुरे , खेमराज राऊत,इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला 
डी जी रंगारी यांनी समोर सांगितले की  समाजामध्ये अजूनही जादू टोना, भूत भा नामती, मंत्र तंत्र हे प्रकार चालू असून यावर आळा बसवायचे असेल तर कार्यकर्त्यांनी जागरूक असले पाहिजे वेडीच दखल घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या तक्रारीचे समाधान केले पाहिजे व प्रयोगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा काय आहे हे समजून सांगितले पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले
याप्रसंगी यशवंत उपरीकर, कागदराव रंगारी ,कल्पना सांगोळे ,शितल नागदेवे यांनी आपले  आपापले मनोगत व्यक्त केले वर्धा येथील शिबिरात  सर्व महिला आघाडी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले नव्याने कार्यकारणी फेरबदल करण्यात आली तसेच नवीन महिला कार्यकारणी गठीत करण्यात आली
अंधश्रद्धा निर्मूलन त्याचा तक्रारीवर विचार येणार विचार विमर्श करण्यात आला कार्यक्रम संचालन समितीचे कोषाध्यक्ष विलास करंजेकर यांनी केले तर आभार अनिल किरणापुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता हेमराज राऊत यशवंत उपरीकर, कागदराव रंगारी ,कल्पना  सांगोळे, पौर्णिमा बोदलकर, गुरुदेव श्रीरंगे यांनी मेहनत घेतली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या