Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी येथे पेटी सेफ्टी किटचे वाटप

 


कलिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा 


भडारा:-महाराष्ट्र इतर इमारत बांधकाम कामगार भंडारा च्या वतीने बावणे कुणबी समाज सांस्कृतिक सभागृह लाखनी येथे पेटी सेफ्टी किट वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कामगार सेल जिल्हाध्यक्ष मार्तंड भेंडारकर व डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांच्या अध्यक्षतेखाली पेटी सेफ्टी किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना भेंडारकर म्हणाले योजनेतंर्गत मुलीच्या लग्नासाठी 51,000/- मिळतात. मुलांना शिष्यवृत्ती मिळते,योजनेंतर्गत स्मार्ट कार्ड बनवून मिळतो ही योजना कशी फायदेशीर आहे या बद्द्ल समजून सांगितले. याप्रसंगी भेंडारकर यांनी आपले मत व्यक्त केले. यांच्यासह जि. प.भंडारा सभापती स्वाती वाघाये, जि. प.भंडारा सदस्या डॉ. मनिषा निंबार्ते, पं. स.लाखनी च्या सभापती प्रणाली सार्वे, लाखनी तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजु निर्वाण, पं. स.लाखनी गटनेते सुनिल बांते, पं. स. सदस्या  मनिषा हलमारे,साकोली विधानसभा युवक काँग्रेस कमेटी महासचिव योगेश गायधने, ज्ञानेश्वर हलमारे आणि सर्व कामगार वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या