कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
भंडारा :-लाखनी तालुक्यात मागील आठवड्यात पाऊस बेपत्ता झाल्यामुळे पेरणी रखडली होती. तर धानाची नर्सरी (पऱ्हे) वाळली होती. पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त झाला असतांनाच रविवारी (ता. १० जुलै) दुपारपासून आणि सोमवारी(ता. ११ जुलै) ला सकाळीपासून संततधार पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असले तरी रोवणीस मात्र सुरुवात झाली आहे. पण पाळीव जनावरांची चाऱ्याअभावी परवड झाल्याचे चित्र दिसत आहे. वातावरणात गारवा निर्माण होऊन गरमीपासून सुटका झाली. तर तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. काही ग्रामपंचायतींनी गावातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांचा उपसा केला नसल्यामुळे अनेक गावातील नाल्या पावसाचे पाण्यामुळे तुडुंब भरल्याने काही घरात पाणी शिरल्याने विश्वसनीय वृत्त आहे. या संततधार पावसामुळे वाळणाऱ्या नर्सरी(पऱ्हे) यांना नवसंजीवनी मिळाली असून रखडलेली पेरणी सुरु होण्याच्या मार्गावर आहे. तरीही वेगाने रोवणी सुरू होण्यास दमदार पावसाची आवश्यकता आहे. पण सोमवार च्या दिवसभर संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वातावरणातील बदलामुळे पुढील २ दिवस पावसाची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे. तर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नाल्या जेसीबी च्या सहाय्याने साफ केल्या असून तिथून निघलेली गाळ सर्विस रोडवर टाकल्यामुळे आणि सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्याने पायी जाने अवघड झाले आहे.
*मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावूस कमी*
रोहिणी नक्षत्रापासून पावसाची सुरुवात होत असते. चालू खरीप हंगामात रोहिणी कोरड्या गेल्या तर मृगाचे शेवटी व आद्रा नक्षत्राचे सुरुवातीला पावसाने हजेरी लावली.तालुक्यात १ जून ते २ जुलै या कालावधीत ३७२.७ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मागील खरीप हंगामात याच कालावधीत ४४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर खरीप हंगाम २०२२ मध्ये याच कालावधीत २२६.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी टक्केवारी ६१ टक्के आहे. तालुक्यात लाखनी, पिंपळगाव, पोहरा, पालांदूर व मुरमाडी / तूप अशी ५ महसूल मंडळ असून मुरमाडी/ आहेत.तूप वगळता बाकी ठिकाणी पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात आले आहे. १ जून ते १० जुलै या कालावधीत लाखनी २२८.२ मिलिमीटर, पोहरा २३२.२ मिलिमीटर, पालांदूर / चौरास ३३४.४ मिलिमीटर तर पिंपळगाव /सडक २५२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून मागील वर्षीच्या तुलनेत साधारणत २४३.३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना २१७.४ मिलिमीटर पाऊस कमी पडल्यामुळे धानाची पेरणी व रोवणीही रखडली आहे.



0 टिप्पण्या