मुनिश्वर बोरकर जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
गडचिरोली:- जिल्हातिल सर्व राशन दुकानदारानी आपल्या न्याय मागण्या साठी एक दिवसाचे धरणे आंदोलन जिल्हा किकारी कार्यालया समोर करण्यात आले . खालील मागणाचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले . सदर मागण्य शासन दरबारी पाठवून आम्हाला न्याय मिळवून घ्यावा अशी मागणी केली . राशन दुकानदाराना मिळत असलेला अनुदान हे तुटपुंजी आहे तो वाढविण्यात यावा . रा शान दुकानदाराना तांदुळ ' गहू , साखर . तेल विकण्याचा परवाना देण्यात यावा . कोरोना काळात अनेकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता राशन प्राप्त करणार्याना राशनउपलब्ध करून दिले . कारोना काळात जे दुकानदार मरण पावले त्याना कोरोना योध्या म्हणून घोषित केले नाही तरी चांलेल परंतु त्यांना आर्थिक मदत मिळण्यात यावी . वं त्यांचा कुटुबातील एका सभासदाना राशनचा परवाना देण्यात यावा . आम्ही वारंवार शासनाला निवेदन देवूनही आमच्या मागण्याचा विचार करीत नाही वरील मागण्या मान्य न झालास आम्ही देशव्यापी आंदोलन उभारू अश्या प्रकारची मागणी घेवून धरणे आंदोलन करण्यात आले . सदर धरणे आदोलनात राशन दुकानदार संघटना जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष सत्यफु ला डोलीकर ' सघटनेचे सचिव अनिल भाडेकर ' अनिल किरमे ' दरडे . भाडेकर ' बांबोळे आदी सहीत गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य राशन दुकानदारांनी धरणे आंदोलन केले .


0 टिप्पण्या