सरगम शाहारे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी जि.गोंदिया
अर्जुनी - मोरगाव :-तालुक्यातील केशोरी जि . प . क्षेत्राचे सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी त्यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींना भेट देत सरपंचांना विश्वासात घेऊन गाव विकासाचा आढावा घेत सविस्तर चर्चा केली . गाव विकासकामांना चालना देण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबवून ग्रामपंचायतस्तरावर आवासून उभ्या असलेल्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले समस्या यावेळी त्यांच्यासोबत पं . स भरनोलीच्या सदस्य रिया बागडे , केशोरी पं . स सदस्य घनश्याम धामट . पं . सदस्य अरुण मस्के उपस्थित होते . गाव विकासाबरोबर परिसरातील प . शाळांचा विकास होणे गरजेचे असल्याने जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी , राजोली , भरनोली इळदा , तुकुमसायगाव या शाळांना भेटी देऊन शालेय अडीअडचणी जाणून घेण्याबरोबर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पडताळणी केली शाळेतील आनंददायी शिक्षण , मन आकर्षित करणाऱ्या शाळेच्या बोलक्या भिंती पाहून जि प . सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी समाधान व्यक्त करून मुख्याध्यापकांकडून अडचणी जाणून घेतल्या .
स्थानिक जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेची रंगरंगोटी आणि बोलक्या भिंती करण्याचा खर्च पं . स . सदस्य घनश्याम धामट यांनी करण्याचे मुख्याध्यापकांना आश्वासन दिले . या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रत्येक गावात जाऊन गावकरी आणि गावचे सरपंच यांच्याशी संवाद साधून गावातील अडचणी जाणून घेतल्या आणि गावनिहाय असलेल्या अडचणी शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले . त्याचबरोबर शाळांना भेटी देऊन प्राथमिक शिक्षणापासून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा , यासाठी पुस्तकी ज्ञानासोबत कला , क्रीडा कार्यानुभव हे विषय शिकविणे काळाची गरज असल्याचे आपण सर्वांनी प्रयत्न करून शाळेचा विकास साधावा , असे मौलिक मार्गदर्शन केले . त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही सांगितले


0 टिप्पण्या