Ticker

6/recent/ticker-posts

हदगाव तालुका भाजपाच्या वतीने पत्रकारावरील हल्ल्याचा जाहीर निषेध


हदगाव तहसीलदार यांना दिले निवेदन

पंकज चव्हाण तालुका प्रतिनिधी हदगाव जिल्हा नांदेड

हदगाव :- किनवट येथील दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी प्रदीप वाकोडीकर यांच्या अंगावर वाहन घालुन भूमाफियाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा हदगाव शहर भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. सदर भूमाफिया हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन शहर भाजपाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे. 
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच घटना किनवट येथे घडली आहे. दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी प्रदीप वाकोडीकर यांनी काही महिन्यांपूर्वी खरबी रोडवरील साईबाबा मंदिरा जवळील फल्डझोनमधील अनाधिकृत टिनशेड व्यापारी संकुलाचे बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासनाने भुखंड माफियांवर  कार्यवाही केल्याच्या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्याचा राग मनात धरून चार चाकी वाहन अंगावर घालून भूमाफियाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा हदगाव तालुका भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून सदर हल्लेखोर भूमाफियावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर भाजपाचे हदगाव तालुकाध्यक्ष बाला पाटील कदम ,तातेराव पाटील, व्यंकटेश लोणे, अतुल इंगळे, किशन कांबळे, संतोष नरवाडे, आशिष पडघणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या