Ticker

6/recent/ticker-posts

निवडनुकी सामोर एकीकृत चा नारा षड्यंत्र :अश्विन मेश्राम वंचित बहुजन आघाड़ी



 मनिष मसुरकर उपसंपादक चित्रा न्युज मो.नं ८८७९३७३१६४


चंद्रपूर :- आंबेडकरवादी पक्ष वर्ष भर काहीच नाही न करता प्रत्येक वेळेला निवडनुक आली की एकीकृत ची भाषा समाजात वापरली जाते.या आधी एकीकरण झाले चार खासदार ही झाले मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता स्वाभिमान गहान ठेवुन लाचारी स्विकारत स्व हितासाठी सत्तेच्या मागे लोटांगण घालत जाणारे स्वता: ची पोळी शेकण्यात धन्यता मानणारे  नेते याच समाजाने उघड्या डोळ्यानी पाहीले 
आंबेडकरवादी पक्ष अनेक आहेत त्यांचे नेते  वेगवगळे असुन आपसात अनेक राजकीय बाबतीत मतभेद आहेत अश्या परस्थितीत एकीकरण शक्य नाही याची जानिव असतांना तरी तुनतुना वाजविला जातो तर एकीकडे आंबेडकरवादी पक्ष विखुरलेले असल्याचा प्रचार करीत समाजमन कलुषीत करण्यात येते पर्याय म्हणुन याचा फायदा आजपावेतो काँग्रेस , राष्ट्रवादी ला झालेला आहे.
 दरवेळेला कुठलीही निवडनुक येई पर्यत  एकीकृत ची भाषा वापरली जात नाही 
मात्र कुठलीही निवडनुक आली की बोंब उठवली जाते .. कारण बौद्ध समाज एक संघ एका आंबेडकरवादी पक्षासोबत उभा झाला तर बौद्ध समाजाला त्यांची राजकीय शक्ती कळेल आणि सत्तेत वाटा मागेल ही भिती बाळगुन रिपब्लिकन एकीकृत चा नारा देत समाजात षड्यंत्र रचीले जाते आणि बौद्ध समाजाचे मतदान फोडण्याचे काम काँग्रेस , राष्ट्रवादी कडुन  होते  या पासुन वेळीच बौद्ध समाजाने सावध व्हावे.
समाजाने एक पक्ष एक संघ मतदान केले तर पक्ष एकीकृत होण्याचा प्रश्न उरणार नाही..मागिल लोकसभा , विधानसभा निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाड़ी ने मताच्या स्वरुपात मिळालेल यश विजया पर्यत नेण्यासाठी एकसंघ होण्याची वेळ आली आहे .
 महाराष्ट्रा मध्ये राजकीय सत्तेपासुन वंचित असलेल्या  घटकाला न्याय मिळवुन देण्यासाठी मा. बाळासाहेब आंबेडकर सक्षमपने अहोरात्र झटत असुन येणा-या नगरपरिषद , नगरपालिका , महानगर पालिका , आणि जि. प ,प.स च्या निवडनुकी मध्ये बौद्ध समाजाने एकसंघ होऊन वंचित बहुजन आघाड़ी सोबत राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ी चे अश्विन मेश्राम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या