Ticker

6/recent/ticker-posts

साहित्याच्या किमती वाढल्यामुळे घरकुल बांधकाम आवाक्याबाहेर



घरकुलाच्या अनुदानात वाढ करावी , माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांचे मागणी 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा

भंडारा:- मागील ६ ते ७ वर्षापासून शासनाने घरकुल निधीत वाढ केली नाही. पण साहित्याच्या किमतीत सातत्याने वाढ होते असल्यामुळे भविष्यात घरकुल बांधकाम दिवास्वप्न ठरणार असल्यामुळे घरकुलाचे निधीत वाढ करावी. अशी माझी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी मागणी केली आहे. 
         मोडकळीस आलेल्या पडक्या घरात, मातीचे व कच्च्या घरात तसेच भाड्याचे(किरायाचे) घरात वास्तव्यास असणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जातीच्या गरीब कुटुंबास रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यास शबरी आवास योजना तर इतर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जातो. २०१५-१६ पासून घरकुलाची किंमत १ लाख ३० हजार होती व मजुरी पोटी १८ हजार ५०० रुपये अशी रक्कम ४ टप्प्यात लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यावर जमा केली जाते. असे माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांचे म्हणणे आहे. 
         घरकुल बांधकामास लागणारे विटा, सिमेंट, लोहा, रेती व दारे, खिडक्या तसेच मजुरीच्या किमतीत सातत्याने वाढ होऊन शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे २७५ स्क्वेअर फूट जागेत घरकुल बांधकामास २.५० ते ३ लाख रुपये खर्च येतो. असे लाभार्थ्यांनी सांगितले. घरकुल लाभार्थी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने घरकुलाचे किमती एवढीच रक्कम स्वतः जवळून गुंतवू शकत नाही. त्यामुळे घरकुल बांधकाम लाभार्थ्यांचे आवाक्या बाहेर असल्यामुळे भविष्यात घरकुल म्हणजे दिवास्वप्न ठरणार आहे. शासनाने सीएसआर दरानुसार घरकुलाची किंमत ठरवून अनुदानात वाढ करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या