Ticker

6/recent/ticker-posts

महामार्गावर बर्निंग टाटाएस चा थरारलाखनी के.के. लॉन समोरील घटना

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :- साकोली वरून भंडारा कडे जाणाऱ्या टाटाएस क्रमांक एमएच ४९ एन ५९७९ चे वायरिंग शॉट झाल्यामुळे लाखनी के.के. लॉन समोरील महामार्गावर आग लागून कॅबीन जाळून अंदाजे १ लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शनिवार(ता.२६) रोजी दुपारी १२:३० वाजता दरम्यान घडली असली तरी जीवितहानी झाली नाही. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्या आले. 
           धनपाल सूभाष सिंगनजुडे(४६) रा. लोनखैरी, तालुका कामठी हा आपले टाटाएस गाडीने भाजीपाला घेऊन साकोली येथे आला. भाजीपाला खाली करून परत जात असताना लाखनी उड्डाण पुलिया लगत टाटाएस गाडीची वायरिंग शॉट झाल्याने गाडीने पेट घेतल्याचे चालकाचे लक्षात आल्याने गाडी खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळालगत उपस्थितांनी घटनेची सूचना महामार्ग पोलीस मदत केंद्र गडेगाव आणि लाखनी पोलिसांना दिली. महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे यांचे मार्गदर्शनात पोलिस पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार नीरज साबळे यांचे नेतृत्वात पोलिस पथक घटनास्थळी गेले. स्थानिकांचे मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. चालक धनपाल सिंगनजुडे सुखरूप असून जीवितहानी झाली नाही. तथा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असली तरी या घटनेने महामार्ग क्रमांक ५३ वर काही काळ बर्निंग टाटाएस चा थरार अनेकांनी अनुभवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या