कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा : गडेगाव येथील स्व.निर्धनराव वाघाये पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.एस.एस शेंडे हजर होते. तर डॉ. एम.एस भैसारे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. सर्वप्रथम संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. एम.एस भैसारे यांनी संवीधानातील मुलभूत अधिकारांवरती सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते प्रा. विजय रंगारी यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली क्रांतीकारी भुमिका मांडली. संवीधानातील तरतुदीनुसार आजपावेतो ओबीसींना हक्क व अधीकार मिळाले नाहीत. याविषयीची खंत व्यक्त केली. डॉ. यु.पी शहारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करीत संवीधानाच्या मार्गदर्शिकेचे सर्वांसमोर वाचन केले. विज्ञान शाखेची विदयार्थीनी कु. दिक्षा कुथे यांनी संवीधानातील स्त्रीहक्कावर व रक्षणार्थ असलेल्या कलमांची थोडक्यात माहीती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. यु.पी शहारे यांनी केले तर आभार डॉ.पी.डी भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील डाॅ. एस.जी. शहारे ,डाॅ.साव॔ व विलास वाघाये, राकेश ऊके, मंगेश बांडेबुचे, विशाल हनवतकर, सचिन बागडे, दिपक वाघाये,विजय शहारे, अमरदास कुभरे.


0 टिप्पण्या