जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत
अर्थसहाय्याच्या २६ प्रकरणांना मंजुरी
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
सांगली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनिय 1989 अंतर्गत पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या व तपास प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आज जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत घेतला आणि अर्थसहाय्याच्या २६ प्रकरणांना मंजुरी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, समाज अधिकारी बाळासाहेब कामत, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, जत, विटा, सांगली शहर, मिरज आणि इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला या कागदपत्रामुळे अर्थसहाय्यासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा करुन कागदपत्रे प्राप्त करुन घ्यावीत.
ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र लवकर मिळविण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. न्यायालयामध्ये स्थगिती असलेल्या प्रकरणांविषयी उच्च न्यायालयात अर्ज सादर करावेत. महाअधिवक्ता व शासन यानांही या विषयी पत्रव्यवहार करावा. प्रलंबित प्रकरणांमध्ये तपास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून लवकर दोषारोप पत्र दाखल करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या.


0 टिप्पण्या